नाकावरून ओळखा समोरच्या माणसाचं व्यक्तिमत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 06:53 PM2018-04-04T18:53:19+5:302018-04-04T18:55:12+5:30
नाकावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही जाणता येतं. चला बघुया अशीच काही नाकांची प्रकारं आणि तसे नाक असणा-या व्यक्तींचे व्यक्तिमत्व....
माणसाच्या चेह-यात नाकाचं महत्वपूर्ण योगदान असतं. नाक माणसाला श्वास घेण्यासाठी मदतगार तर ठरतंच त्यासोबत माणसाच्या सुंदरतेतही भर घालतं. यासोबतच नाक माणसाबद्दल खूप काही सांगतं. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, नाकावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही जाणता येतं. चला बघुया अशीच काही नाकांची प्रकारं आणि तसे नाक असणा-या व्यक्तींचे व्यक्तिमत्व....
१) स्ट्रेट नोज
ज्या लोकांचं नाक स्ट्रेट(सरळ) असतं ते बालपणापासूनच लॉजिकल थिंकर असतात. त्यांना त्यांच्या इमोशनवर कंट्रोल करणं माहिती असतं. ते अधिक जास्त बुद्धीमान असतात. असे लोक कितीही कठिण काळात आपल्या रागावर नियंत्रण मिळवतात. आपल्या कामांना खूप सिरीअसली घेतात आणि ते काम परफेक्ट पद्धतीने करतात.
२) न्यूबियन नोज
न्यूबियन नोज एक फ्लॅट नाक असतं. हे नाक वरच्या बाजूला बारीक, छोटं आणि खालच्या बाजूला पसरट असतं. नाकाचा खालचा भागही गोल असतो. अशाप्रकारचे नाक असणारे लोक हे खूप अधिक पॅशनेट आणि क्रिएटीव्ह असतात. अशाप्रकारचं नाक बराक ओबामा यांचं आहे. असे लोक नेहमीच सकारात्मक विचार करतात आणि खुल्या विचारांचे असतात. ते बोलतानाही अतिशय मोकळे आणि इमानदार असतात.
३) टर्नड अप नोज
याप्रकारचं नाक लांब आणि कर्व्ही असतं. खालच्या बाजूला हे नाक लांब आणि वरच्या बाजूला घुमावदार असतं. हे लोक आशावादी आणि उत्साही असतात. हे लोक आपल्या मित्रांच्या आणि परिवाराच्या बाजूने नेहमीच उभे असतात.
४) ग्रीक नोज
काही लोकांच्या चेह-यांचा आकार यूनानियांसारखा असतो. यूनानी नाकाचं नातं कौशल्य, सकारात्मक ऊर्जा, बुद्धी, मानसिक संतुलनाशी जोडलेलं आहे. कधी कधी असे लोक आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. मोनालिसाचं नाक या आकाराचं नाक होतं.
५) रोमन नोज
अशाप्रकारचे नाक असलेल्या लोकांना महत्वाकांक्षी मानलं जातं. ते महान नेता आणि मजबूत व्यक्तीत्व असलेले असतात. यासोबतच ते तीव्र घमेंडीही असतात. असे लोक संघटन उभं करण्यातही सक्षम असतात. क्लियोपात्रा, क्वीन डायना आणि मार्गारेट थेचर यांचे नाक रोमन आहे.
6) बीक नोज
अशाप्रकारचं नाक नॅरो आणि छोट्या हुकप्रमाणे असते. हे नाक पक्षांच्या चोचप्रमाणे असतं. अशाप्रकारचे नाक मध्यभागी जरा घुमावदार असतं. जनरली हे लोक अधिक रचनात्मक असतात. जेव्हा या लोकांजवळ कुणी यायला बघतं, तेव्हा ते सहज अॅक्सेप्ट करू शकत नाहीत.
७) हुक्ड नोज
हे नाक बारीक आणि वरून खालच्या बाजूला जरा जाड असतं. या नाकाचा शेंडा घुमावदार असतो. अशाप्रकारचं नाक असणारे लोक प्रत्येक कामात सहभागी होतात. ते काहीही करू शकतात. मैत्री करण्याआधी ते खूप विचार करतात. ते सहज कुणावर विश्वासही ठेवत नाहीत.
८) कानविक्स नोज
अशाप्रकारचं नाक वरून खालच्या बाजूला आतल्या साईडला झुकलेलं असतं. अशाप्रकारचं नाक असणारे लोक करिश्माई असतात असं मानलं जातं. जर एखादी गोष्ट करण्यासाठी अडचण येत असेल तर त्यांना माहिती असतं की, ते काम कसं करायचं आहे. या लोकांना प्रभावित करण्याची वेगळीच कला अवगत असते. हे लोक खूप मेहनती असतात.
९) स्नब नोज
अशाप्रकारचं नाक छोट्या आकाराचं असतं. हे नाक सरळ असतं आणि जास्त पसरलेलं नसतं. काही लोक या नाकाला चपटं नाकही म्हणतात. हे लोक खूप तर्कवादी असतात. कधी कधी ते आक्रामक होतात. हे लोक इतरांसोबत प्रेमाने वागतात.
१०) बटन नोज
बटनच्या आकाराचं दिसणारं हे नाक छोटं असतं. ज्या लोकांचं नाक असं असतं ते खूप सहज असतात. ते निर्णय घेण्यात सक्षम असतात. ते दुस-यांना त्यांच्या कामाने रागही आणतात. हे लोक खूप जिद्दी असतात. ते व्यापारीपण असतात.
११) फ्लॅशी नोज
असे नाक पूर्णपणे पसरलेले असते. शेवटी हे नाक थोडं चपटं असतं. अशाप्रकारचं नाक असणारे लोक खूप चतुर असतात. ते लगेच प्रतिक्रिया देतात. ते कधी कधी आक्रामकही वागतात. असे लोक खूप फास्ट दिमागाचे असतात. ते इमानदारही असतात.