हे आहेत सिंगल असण्याचे 6 फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 12:40 PM2018-04-02T12:40:05+5:302018-04-02T12:40:05+5:30
अलिकडे सिंगल राहने पसंत करणा-यांचीही संख्या वाढलेली बघायला मिळते. बॉयफ्रेन्ड असण्याचे फायदे अनेकांना माहिती असतीलच किंवा नसतीलही.
आज प्रत्येक दुस-या मुलीला बॉयफ्रेन्ड असतो. कुणी खरंच प्रेमात पडलेले असतात तर कुणी केवळ आपल्या मैत्रिनींना बॉयफ्रेन्ड आहे म्हणून मलाही हवा असा विचार करत बॉयफ्रेन्ड बनवतात. अशात एक असंही निरीक्षण आहे की, अलिकडे सिंगल राहने पसंत करणा-यांचीही संख्या वाढलेली बघायला मिळते. बॉयफ्रेन्ड असण्याचे फायदे अनेकांना माहिती असतीलच किंवा नसतीलही. पण आम्ही आज तुम्हाला सिंगल असण्याचे काही फायदे सांगणार आहोत.
1) स्वत:ला खूश ठेवण्यावर लक्ष -
जो व्यक्ती सिंगल आहे तो व्यक्ती स्वत:वर, स्वत:ला खूश ठेवण्यावर पूर्णपणे लक्ष देऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक अलिकडे सिंगल राहण्यावरही भर देऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या रिसर्च मधूनही हे समोर आले आहे की, सिंगल राहण्याचेही अनेक फायदे आहेत.
2) सिंगल लोकांची घट्ट मैत्री -
रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे की, ज्या लोकांचं लग्न झालेलं आहे किंवा जे लोक रिलेशनशीपमध्ये आहेत, अशांच्या तुलनेत जे लोक सिंगल असतात त्यांचं आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी आणि शेजा-यांशी अधिक चांगलं नातं असतं.
3) सिंगल लोक असतात अधिक फिट -
एका अभ्यासातून समोर आलं आहे की, ब्रिटनचे ७३ टक्के लोक एका आठवड्यात १५० मिनिटेही एक्सरसाईज करू शकत नाही. हे सगळे लोक विवाहीत आहेत. तेच सिंगल किंवा घटस्फोटीत लोक अधिक फिट राहतात. २०१३ मध्ये झालेल्या एका सर्व्हेनुसार हे समोर येतं की, नव्याने लग्न झालेल्या जोडप्याचे ४ वर्षातच वजन वाढतं.
4) करिअरकडे अधिक लक्ष -
सिंगल लोक हे आपल्या करिअरकडे अधिक चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत करु शकतात. एका रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, लग्न झालेल्या किंवा रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोक आपल्या कामाला जास्त एन्जॉय करतात.
5) पैशांची बचत -
आपल्या नातेवाईकांच्या घरी जायचे असो वा माहेरच्या लोकांसाठी गिफ्ट घ्यायचं असो किंवा आपल्या पार्टनरसोबत डेटवर जायचं असो. अशावेळी सिंगल लोकांपेक्षा लग्न झालेल्या लोकांचा खर्च अधिक होतो. यासोबतच सिंगल लोकांची कर्ज घेण्याची शक्यताही कमी असते.
6) चांगली लागते झोप -
सिंगल असण्याची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला तुमचा बेड कुणाही सोबत शेअर करावा लागत नाही. तुमचं जेव्हा मन असेल तेव्हा तुम्ही झोपू शकता, कधीही उठू शकता, कुणीही विचारणारं नसतं. आणि अस असल्याने तुमची झोपही पूर्ण होईल आणि त्यामुळे कामही चांगलं होईल.