मुंबई - लग्न करण्याआधी आपण व्यक्ति, पैसा आणि कुटुंब पाहतो. बहुतेकदा लव्ह मॅरेजमध्ये आपण जोडीदाराच्या प्रेमात इतके बुडून जातो कि, अनेक महत्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते. जाणून घेऊया अशा कोणता गोष्टी आहेत ज्या लग्नाआधीच जाणून घेण महत्वाच आहे.
- आपण ज्याच्यासोबत लग्न करत आहोत तो मानसिकदृष्टया लग्नासाठी तयार आहे किंवा नाही हे सर्वात पहिले तपासले पाहिजे. मुलगी किंवा मुलगा आई-वडिलांच्या आग्रहाखातर किंवा अन्य कुठल्या हेतूसाठी लग्न तर करत नाही ना हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
- होणा-या नव-याच्या नोकरीबद्दल अचूक माहिती असलीच पाहिजे. फक्त शाब्दीक बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. फक्त नोकरीच नाही पगाराचीही माहिती असली पाहिजे.
- लग्नानंतर स्वतंत्र राहणार कि, कुटुंबासोबत हे प्रश्न सुद्धा विचारले पाहिजेत. लग्नानंतर तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टींसाठी तुम्हाला भाग पाडले जाणार असेल तर ते आधीच जाणून घ्या.
- भावी पती नोकरी करत नसेल तर त्याची गुंतवणूक आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती घ्या, तो दुस-या कुणावर तर अवलंबून नाही ना हे जाणून घ्या.
- आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घ्या. त्याच्या किंवा तिच्या काही सवयी तुम्हाला आवडणा-या किंवा अजिबात न आवडणा-या असू शकतात. अनेकदा चुकीच्या सवयी भांडणासाठी कारण ठरतात.