१० तरुणांची फसवणूक

By Admin | Published: May 9, 2017 02:22 AM2017-05-09T02:22:40+5:302017-05-09T02:22:40+5:30

मुंबई महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून दहा तरूणांची १७ लाख ५६ हजारांची फसवणूक करणाऱ्या किशोर देव आणि गणेश जाधव यांना पोलिसांनी कामोठे येथून अटक केली.

10 youth cheating | १० तरुणांची फसवणूक

१० तरुणांची फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : मुंबई महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून दहा तरूणांची १७ लाख ५६ हजारांची फसवणूक करणाऱ्या किशोर देव आणि गणेश जाधव यांना पोलिसांनी कामोठे येथून अटक केली.
या भामट्यांनी दाखवलेल्या आमिषाला चेतन कोळी, भाग्यश्री समरंग, ललिता कोळी, सागर पाटील, रोशन पाटील, जगदीश नायगावकर, ऋषिकेश नायगावकर, वैभव नायगावकर, संजय जाधव हे बळी पडले. भामट्यांनी त्यांना बँक आॅफ महाराष्ट्रमधील खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. रक्काम भरल्यानंतरही इंटरव्ह्यूसाठी कॉल न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपापले पैसे मागण्याचा तगादा लावला. आपली रक्कम परत मिळत नाही हे पाहून या मुलांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: 10 youth cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.