वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी ११९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 08:22 AM2021-09-26T08:22:47+5:302021-09-26T08:23:49+5:30

विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना यश.

119 crore for Wardha Yavatmal Nanded railway | वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी ११९ कोटी

प्रातिनिधीक छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्देविजय दर्डा यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड : विदर्भ-मराठवाडा हे दोन्ही प्रदेश जोडण्याच्या प्रक्रियेत वरदान ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलाेमीटरच्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी ११९ काेटी ५१ लाख रुपयांच्या निधीचा आपला वाटा मंजूर केला असून, रेल्वे विभागाला वितरितही केला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी रेल्वेने मागणी केल्याबरोबर निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग विदर्भ-मराठवाड्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाताे. त्यासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याकडे ‘लाेकमत’ समूहाच्या एडिटाेरिअल बाेर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी १२ डिसेंबर २०२० राेजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले हाेते. या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग ‘फास्ट ट्रॅक’वर टाकावा, अशी मागणीही पत्रात करण्यात आली हाेती. 

या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांना कार्यवाहीची सूचना केली होती. त्यानुसार, ॲड. परब यांनी २० सप्टेंबर २०२१ रोजी विजय दर्डा यांनी पाठविलेल्या पत्रात राज्याच्या निधीचा लेखाजोखा सादर केला आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२० पर्यंत राज्याच्या वाट्याचे ४५५ कोटी ११ लाख रुपये तर २०२०-२०२१ आर्थिक वर्षात आणखी ११९ कोटी ५१ लाख रुपये  रेल्वे विभागाला वितरित करण्यात आले आहेत. अशा रीतीने आतापर्यंत राज्य शासनाने आपल्या वाट्याचा ५७४ कोटी ६२ लाखांचा निधी मध्य रेल्वेला वितरित केला आहे. सन २०२१-२०२२ या वर्षात रेल्वेने या मार्गासाठी अद्याप निधीची मागणी केलेली नाही. ती होताच राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी पुरविला जाईल, अशी ग्वाही ॲड. परब यांनी विजय दर्डा यांना दिली आहे.

पावणेतीनशे कोटींचा प्रकल्प १६०० कोटींवर

  • फेब्रुवारी २००८ ला वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग जाहीर झाला होता. ११ फेब्रुवारी २००९ ला तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन पार पडले.
  • या प्रकल्पाची मूळ किंमत २७४ कोटी ५५ लाख एवढी होती. सध्या हा प्रकल्प १६०० कोटींवर पोहोचला आहे.
  • २८४ किमीच्या मार्गात एकूण २७ स्टेशन्स असून, त्यातील तीन जुनी आहेत. वर्ध्यापासून यवतमाळपर्यंत मार्गाचे मातीकाम पूर्ण झाले आहे.

 

Web Title: 119 crore for Wardha Yavatmal Nanded railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.