शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

शासन सोडविणार १७ कोटींचे सोने

By admin | Published: December 30, 2015 1:57 AM

शेतकऱ्यांनी परवानाप्राप्त सराफा व्यापाऱ्याकडे गहाण ठेवलेले १७ कोटी २९ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खुद्द शासन सोडविणार आहे. शासनाच्या सावकारी कर्जमुक्ती योजनेचा पश्चिम

- राजेश निस्ताने,  यवतमाळशेतकऱ्यांनी परवानाप्राप्त सराफा व्यापाऱ्याकडे गहाण ठेवलेले १७ कोटी २९ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खुद्द शासन सोडविणार आहे. शासनाच्या सावकारी कर्जमुक्ती योजनेचा पश्चिम विदर्भातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. सतत दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी थकबाकीदार झाल्याने बँका त्यांना कर्ज देत नाही. अशा वेळी शेतकऱ्याला आपल्या घरातील दागदागिने गहाण ठेवून पेरणीची वेळ निभावून न्यावी लागते. मात्र, नापिकीमुळे हे गहाण ठेवलेले दागिने सोडविणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. अनेकदा हे दागिने सावकाराकडेच बुडतात. यंदा भाजप-सेना युती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जमुक्तीची घोषणा केली. शेतकऱ्याच्या घरातील कुणीही सरकारी नोकरीत असू नये, एका कुटुंबातील केवळ एकच गहाण मुक्त केले जाईल, असा निकष त्यासाठी ठेवला गेला. गेल्या वर्षभरात पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात १ लाख १३ हजार ३२८ शेतकऱ्यांनी परवानाप्राप्त सावकाराकडे दागिने गहाण ठेवले. ही प्रकरणे तपासणीसाठी आॅडिटर व तलाठ्यांकडे देण्यात आली. आतापर्यंत त्यातील ८ हजार ५३८ प्रकरणे निकषानुसार पात्र ठरली.त्यात २७९ परवानाप्राप्त सावकारतथा सराफा व्यापाऱ्यांकडे गहाण ठेवलेले १७ कोटी २९ लाख ९६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, शासनाकडून कर्जमुक्त केले जाणार आहे. ही रक्कम शासन स्वत: सावकारांच्या बँक खात्यात थेट जमा करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही मुदत असल्याने, गहाणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी कळंब येथे सहायक निबंधक कार्यालयात सावकार व संबंधित शेतकऱ्यांना बोलावून दागिने परत करण्याची कार्यवाही केली गेली. सावकारी कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात घेतला गेला. सर्वात कमी प्रकरणे अकोला जिल्ह्यात दाखल झाली. आॅडिटर व्याज, तर तलाठी शेती आहे की नाही, याची तपासणी करीत आहे. अद्याप ५० टक्के प्रकरणे तपासायची असल्याने, सावकारी कर्जमुक्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या तो १७ कोटी २९ लाख एवढा आहे.- श्रीमती एस.आर. डोंगरे, विभागीय सहनिबंधक, अमरावती