शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
5
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
6
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
7
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
8
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
9
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
10
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
11
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
12
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
13
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
14
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
15
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
16
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
17
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
18
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
19
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
20
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

एक्स्प्रेस-वेवर अपघातात १७ ठार

By admin | Published: June 06, 2016 3:44 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे खासगी ट्रॅव्हल्सची बस दोन मोटारींना धडक देत, रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार झाले.

पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे पनवेलजवळील भाताण व शिवकर या गावांजवळ खासगी ट्रॅव्हल्सची बस दोन मोटारींना धडक देत, रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ जण जखमी झाले. मृतांमध्ये सहा पुरुष, नऊ महिला व दोन लहान मुलींचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. रविवारी पहाटे एक्स्प्रेस-वेवर गाडीचा टायर फुटल्याने एक स्विफ्ट कार उजव्या लेनमध्ये उभी होती. त्यातील प्रवासी मदतीसाठी हात करत असल्याने, लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शन करून परतणाऱ्या इनोव्हा कारमधील प्रवाशांनी गाडी डावीकडील लेनमध्ये लावली. ते मदत करत असताना साताऱ्यावरून मुंबईकडे येणाऱ्या निखिल ट्रॅव्हल्सची बस वेगात आली. समोर स्विफ्ट कार व प्रवासी पाहताच बसच्या चालकाने धडक टाळण्यासाठी बस डावीकडे वळवली, पण बस वेगात असल्याने ती स्विफ्टला धडकलीच, शिवाय पुढे जाऊन इनोव्हालाही धडक देत, रस्त्यालगतच्या २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात बसमधील ११ जण जागीच ठार झाले. सर्व मृत प्रवासी बसमधील आहेत. एकनाथ शिंदेंकडून विचारपूससार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालय, पनवेल ग्रामीण रुग्णालय आणि पॅनाशिया रुग्णालयांना भेट देऊन जखमींची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)मृतांची नावे अनन्या कल्याण कदम (३.५) ठाणे, वेदिका नीलेश यादव (२) सातारा, श्रद्धा दत्तात्रेय काळे (२०) कांदिवली, अविनाश हनुमंत कारंडे (३९) भांडुप, विलास बाबुराव माने (६२) नेरुळ, चतुरा शिवाजी कदम (४३) ठाणे, प्रियांका कल्याण कदम (२२), काशिनाथ सखाराम निकम (४५) सातारा, इकबाल बाबमलाल शेख (६६) सातारा. जयश्री उत्तम गाडे (५0), वैजयंती मनोहर गुजर (४0) मुंबई, संदीप यशवंत शिवरकर (३४) सातारा, संदीप विठ्ठल चव्हाण (२२) ठाणे, ऋतिका प्रकाश गायकवाड (११) ठाणे, कविता प्रकाश गायकवाड (३४) ठाणे, पद्मा महेशकुमार बदल्वा (४५) गोरेगाव, चंद्रभागा बाळकृष्ण चव्हाण (५0 ) कांदिवली.>>अपघाताला कारणीभूत ठरलेल्या स्विफ्ट गाडीला दोन वेगवेगळे क्रमांक असल्याचे समोर आले आहे. पुढील बाजूस एमएच 0२ सीएल १४८0 तर मागील बाजूस एमएच 0४ सीएल १४८0 हा क्र मांक आहे. त्यामुळे ही गाडी चोरीची असल्याचा संशय आहे.