राज्य उत्पादन शुल्क विभागातील १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 04:00 AM2019-06-02T04:00:08+5:302019-06-02T04:00:14+5:30
बुलडाण्याचे अधीक्षक सुधाकर कदम यांची बदली औरंगाबाद येथे अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव हे या वर्षी निवृत्त होणार असल्याने त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक ते सह आयुक्त दर्जाच्या एकूण १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सह आयुक्त गट ‘अ’ या संवर्गातील विश्वनाथ इंदिसे (मळी व मद्यार्क) यांची बदली सह आयुक्त (प्रशासन), तनुजा दांडेकर (प्रशासन) यांची बदली सह आयुक्त (मळी व
मद्यार्क) या पदावर करण्यात आली आहे.
नाशिकचे विभागीय उप आयुक्त प्रसाद सुर्वे यांची बदली पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. नागपूरचे विभागीय उप आयुक्त यू. आर. वर्मा यांची बदली संचालक (अंमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क या पदावर करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे अधीक्षक अनिल चासकर यांची बदली सातारा जिल्हा अधीक्षकपदी करण्यात आली आहे.
तर, बुलडाण्याचे अधीक्षक सुधाकर कदम यांची बदली औरंगाबाद येथे अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव हे
या वर्षी निवृत्त होणार असल्याने त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय १० निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगरमधील ‘पी’ विभागातील जी. आर. राजूरकर यांची बदली ‘ई’ विभागात, ‘यू’ विभागातील बी. के. जाधव यांची बदली ‘डब्ल्यू’ विभागात, ‘डब्ल्यू’ विभागातील आर. बी. बिराजदार यांची ‘एन’ विभागात, ‘एन’ विभागातील एन. एन. नागरगोजे यांची बदली ‘यू’ विभागात तसेच ए. डी. देशमुख यांची ठाणे येथील ‘सी’ विभागातून मुंबई शहरमधील ‘आय’ विभागात बदली करण्यात आली आहे.
पुण्यातील हडपसर येथील व्ही. ओ. मनाले यांची बदली दौंड विभागात, खोपोली येथील बालाजी माने यांची बदली हडपसर येथे, खामगाव येथील किरणसिंह पाटील यांची बदली चाळीसगाव येथे, इचलकरंजी येथील एल. एम. शिंदे यांची बदली सातारा येथे व औरंगाबाद येथील के. एम. जाधव हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांना त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.