नाशिक : त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरात असलेल्या सोसायटीतील बांधकाम व्यवसायिकाच्या फ्लॅटच्या दरवाजाचा लॅच तोडून चोरट्यांनी भरदिवसा १९ लाख रुपयांंचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली़ चोरी गेलेल्यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिण्यांचा समावेश आहे़ दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मानगरमधील आर्चित निकेतन या इमारतीतील फ्लॅट नंबर ४ मध्ये बांधकाम व्यवसायिक दर्शन किशोर रुमाले हे कुटुंबियांसह राहतात़ काही दिवसांपुर्वीच त्यांची पत्नी ही माहेरी तर आई-वडीलही पुण्याला गेलेले होते़ तर रुमाले ही त्यांच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या आॅफीसला गेले होती़ ही संधी साधून चोरट्यांनी रविवारी दुपारी ११़५० ते ३ दरम्यान या बंद फ्लॅटचा दरवाजाचा लॅच तोडून घरात प्रवेश केला़चोरट्यांनी रुमाले यांच्या घरातील लोखंडी व लाकडी कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेले १७ लाख ५० हजार रुपये रोख (दोन हजार व पाचशेच्या नोटा) व १ लाख २० हजार रुपये किमतीचे ६ तोळ्याचे मंगळसूत्र असा १८ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ सायंकाळी घरी आलेल्या रुमाले यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली़ यानंतर पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ, अशोक नखाते, गंगापूरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के़डी़पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़या घरफोडीच्या तपासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते़ श्वानाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात यश आले नाही़ या प्रकरणी रुमाले यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, महात्मानगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा माग काढण्याच प्रयत्न सुरू आहे़
नाशिकमध्ये बिल्डरच्या घरी १९ लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:35 PM
नाशिक : त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरात असलेल्या सोसायटीतील बांधकाम व्यवसायिकाच्या फ्लॅटच्या दरवाजाचा लॅच तोडून चोरट्यांनी भरदिवसा १९ लाख रुपयांंचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली़ चोरी गेलेल्यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिण्यांचा समावेश आहे़ दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे़
ठळक मुद्दे महात्मानगरमधील घटना : रोख रकमेसह सोन्याच्या दागिण्यांचा समावेशगंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल