औरंगाबाद/ नाशिक/अकोला/ पुणे: राज्यात ठिकठिकाणी गणेश विजर्सन करताना बुडल्याने २० गणेश भक्ताना जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये नांदेड, जालना, नाशिक प्रत्येकी चारजण, यवतमाळ, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दोघे तर पुणे व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.मराठवाड्यात ९ जण बुडालेजालना जिल्ह्यात गणेश विसर्जन करताना सौरभ जैस्वाल (१७), सिध्दार्थ वाघमारे (१८), समीर पठाण (१८), व कैलास राठोड हे बुडून मरण पावले. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यात आष्टीतांडा येथे कपील आडे (२५), अनिल राठोड (१८) तर अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील धनंजय जाधव (२१) याचा खदानीत बुडून मृत्यू झाला़ दरेसरसम तलावात शंकर मादसवार (३२) याचा बुडून मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात वडोद बाजार येथे रामेश्वर काटकर (३४) या शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.नाशिक जिल्ह्यात चौघांचा मृत्यूनाशिक जिल्ह्यामध्ये देवळालीगाव येथे नरेश कोळी (३६) व चेहेडी पंपिंग स्टेशनजवळील अजिंक्य गायधनी (२२) हे दोघे युवक वालदेवी नदीमध्ये बुडाले. पिंपळगाव बसवंत येथे विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना रवींद्र मोरे (३६) या ग्रामपंचायत कर्मचाºयाचा मृत्यू झाला. देवळा तालुक्यातील वाखारी येथील प्रशांत वसंत गुंजाळ (२७) हा लष्करातील जवान विहिरीत बुडून मरण पावला.२ भावंडांसहचौघांचा मृत्यूअकोला शहरातील बाळापूर नाका येथील छायाचित्रकार रुपेश आमले व त्यांचा लहान भाऊ कल्पेश आमले हे दोघेही पाण्यात बुडाले. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापूर येथे यागेश रामा शिनगारे (२२) हा युवक पाण्यात बुडाला. गोद्री येथे शरद अशोक खंडारे (२८, रा. भोकर) हा तरुण बुडून त्याचा मृत्यू झाला.
विघ्नहर्त्याला निरोप देताना २० बुडाले , मराठवाड्यात सर्वाधिक ९ भाविकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 5:13 AM