शहरं
Join us  
Trending Stories
1
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
4
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
5
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
6
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
7
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
8
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
9
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
10
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
11
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
12
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
13
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
14
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
15
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
16
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
17
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
18
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
19
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
20
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

राज्यात ३०० शेल्टर होम्स उभारणार

By admin | Published: May 17, 2016 5:49 AM

बालगृहांची दुरवस्था झालेली असतानाच आता प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे सुमारे ३०० ते ३५० नवीन शेल्टर होम्सना मंजुरी देण्याचा घाट घालण्यात आला

स्नेहा मोरे,

मुंबई-राज्यात सध्या कार्यरत असलेल्या बालगृहांची दुरवस्था झालेली असतानाच आता प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे सुमारे ३०० ते ३५० नवीन शेल्टर होम्सना मंजुरी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. तर बीड जिल्ह्यात नव्याने बालगृहाला मंजुरी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. तीन वर्षांपासून भोजन अनुदान निधीची कमतरता असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगितले जात असतानाच हा निर्णय घेण्यात आला आल्याने विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. अनुदानाअभावी मरणासन्न अवस्थेत आलेल्या राज्यातील ७०३ स्वयंसेवी बालगृहांचे ज्वलंत प्रश्न महिला व बालविकास विभागाने नजरेआड केले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बीड जिल्ह्यात नवीन बालगृहास तत्त्वत: मान्यता देण्याचा शासन निर्णय काढून जुन्या संस्थांना डावलण्यात आले आहे. त्यात नव्याने मंजुरी न देण्याचे धोरण २०१०पासून स्वीकारण्यात आले आहे. ते बाजूला ठेवत विभागाने बीड जिल्ह्यातील उजनी (पाटी) ता. अंबाजोगाई येथील रोकडेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था धर्मापुरी संचलित संस्थेला १०० मुलांसाठी बालगृहाला मान्यता देणारा शासन निर्णय काढण्यात आला होता. सरकारचा दुटप्पीपणा अधोरेखित झाल्याचा आरोप बालगृह चालक व कर्मचारी महासंघाने केला आहे. राज्यात बालगृहे कमी म्हणून की काय, महिला व बालविकास विभागाने प्रत्येक तालुक्यात २५ बालकांसाठी १ या हिशेबाने सुमारे ३०० ते ३५० नवीन शेल्टर होम (निवारा गृहे) सुरू करण्याचे प्रस्ताव आयुक्तालय स्तरावर मागविले आहेत. जवळपास १०० ते १२५ प्रस्ताव विभागाच्या पुणेस्थित आयुक्तालयात दाखल झाले आहेत. या प्रस्तावांची छाननी करून लवकरच मान्यता देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.अनुदानवाटपातील भेदभावाची चर्चावादग्रस्त आदेशानुसार, अनुदानवाटपातील भेदभावाचे प्रकरण मंत्रालय आणि आयुक्तालय स्तरावर गाजत आहे. त्यात नव्याने संस्था मान्यतेची बाब राज्यात प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या संस्थांचे खच्चीकरण करणारी असल्याची तीव्र भावना महाराष्ट्र राज्य बालगृह चालक व कर्मचारी महासंघाने व्यक्त केली आहे.महिला व बालविकास विभागाने प्रथम कार्यरत असलेल्या संस्थांना नियमित अनुदान, कर्मचाऱ्यांना वेतन आणि बालगृह इमारतींना भाडे देण्याचा निर्णय घ्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया महासंघाने व्यक्त केली आहे.