सोलापूर : त्रुटी पूर्ण करून शासनाला सादर झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या व पैसे परत आलेच नाहीत. याशिवाय तपासणीत नव्याने त्रुटीतील चार हजार शेतक-यांची नावे अचूक झाली असून दीड लाखावरील रक्कम भरलेल्या शेतक-यांच्याही खात्यावर पैसे जमा होत नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५१ हजार १५५ शेतकºयांची २६५ कोटी रुपये इतकी रक्कम आतापर्यंत खात्यावर जमा झाली आहे. शासनाकडून आलेल्या ‘ग्रीन’ यादीच्या तपासणीत त्रुटी पूर्ण झालेल्या २८ हजार ३७० शेतक-यांच्या अचूक याद्या शासनाला सादर केल्या आहेत; मात्र या याद्या बँकेला परत आल्या नाहीत व त्यासाठी पैसेही आले नाहीत. याशिवाय १० हजार १४० शेतकºयांची ‘यलो’ यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आली होती. ही यादी त्या-त्या विकास सोसायटीमार्फत तपासणी केली असता त्यात चार हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत.
आता ही यादी शासनाकडे जाणार आहे. याशिवाय दीड लाखावरील रक्कम भरणा-या (ओ.टी.एस.) शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. या सर्व शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासनाकडून पैसे येणे आवश्यक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यास शासनाची परवानगी नाही.त्रुटी पूर्ण केलेल्या याद्या दुरुस्त करून परत पाठविल्या आहेत. दीड लाखावरील रक्कम भरणा-या शेतक-यांच्या खात्यावरही कर्जमाफीची रक्कम जमा करावयाची आहे. शासनाकडून पैसे येत नसल्याने कर्जदार लटकले आहेत. आमच्याकडे शिल्लक असलेले ८ कोटीही शासनाने परत घेतले. शिल्लक असलेले सव्वादोन कोटीही जमा करण्यात परवानगी नाही.राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा बँकदीड लाखावरील रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करणार आहे. जिल्हा बँकेच्या २९२ शेतकºयांनी दीड लाखावरील एक कोटी ३४ लाख २३ हजार रुपये इतकी रक्कम कर्जखात्यावर भरली आहे. कर्जमाफीचे ४ कोटी ३८ लाख रुपये कर्जखात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसे देत नाही. पैसे भरणाºया शेतकºयांना नाहक व्याज भरावे लागते शिवाय पैसे भरुनही नव्याने कर्ज मिळेना झाले आहे.