चोरीच्या दागिन्यांची ओळख परेड घ्यावी : अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:32 PM2018-09-26T20:32:52+5:302018-09-26T20:39:22+5:30

राज्यातील मे ते डिसेंबर १०१७ या कालावधीतील ११ प्रकरणाचा उत्कृष्ट अपराधसिद्धी बक्षीस देऊन ४७ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा गौरव करण्यात आला़

47 police officers and their team felicitated for good detection of crime | चोरीच्या दागिन्यांची ओळख परेड घ्यावी : अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची सूचना

चोरीच्या दागिन्यांची ओळख परेड घ्यावी : अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची सूचना

Next

पुणे : दारू आणि चोरीच्या गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण कमी असून ते वाढविण्यासाठी दागिन्यांची ओळख परेड घेतली तरी गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते व या गुन्ह्यात सरकारी पंचही पोलिसांना घेता येईल, अशी सूचना सीआयडीचे प्रमुख व अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांनी केली़ .राज्यातील मे ते डिसेंबर १०१७ या कालावधीतील ११ प्रकरणाचा उत्कृष्ट अपराधसिद्धी बक्षीस देऊन ४७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला़. या कार्यक्रमात ते बोलत होते़. 

        संजीव सिंघल म्हणाले, पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना प्रोत्साहित करण्याकरीता उत्कृष्ट कर्तव्य पार पाडणाऱ्यांना गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न, उत्कृष्ट अपराधसिद्धी आणि सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत या बक्षीसासाठी प्रत्येक महिन्याला निवड करण्यात येते़. २०१३ पासून गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे़.  भारतातील सर्व राज्यांतील शिक्षांचे प्रमाण पहात ते अजूनही कमी आहे़. राज्यात एकूण पावणेदोन लाख गुन्ह्यांपैकी ६० हजार गुन्हे हे मुंबई पोलीस अ‍ॅक्टचे असतात़ त्यात २५ टक्के दारुशी संबंधित असून त्यानंतर जुगार व अमली पदार्थांचे गुन्हे आहेत़. तसेच सव्वा दोन लाख गुन्ह्यांपैकी ४० टक्के गुन्हे दुखापतीचे असतात़ .या गुन्ह्यात हत्यार हस्तगत करणे अत्यावश्यक आहे़. अशा गुन्ह्यात पुढे फिर्यादी उलटतात़. चोरीमध्ये गेलेले दागिने हेच असल्याचे सिद्ध करावे लागते़ . अशावेळी पोलिसांनी जशी आरोपींची ओळख परेड घेतो, अशी दागिन्यांची ओळख परेड घेतली तर शिक्षा होण्याच्या प्रमाणावर वाढ होऊ शकेल़.या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक, डॉ़ जय जाधव, पालीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होते़. राज्यातील मे ते डिसेंबर २०१७ या कालावधीत उत्कृष्ट अपराध सिद्धी या बक्षिसासाठी निवड झालेल्या ११ गुन्ह्यांमधील ४७ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला़ .

  • मे २०१७मधील रामनगर पोलीस ठाणे (चंद्रपूर) पोलीस निरीक्षक एम़ डी़ शरणागत, उपनिरीक्षक राधेश्याम रामायण पाल, हवालदार सुरेश केमेकर, राजू मेश्राम, या गुन्ह्यात फिर्यादीशी शारिरीक संबंध करुन व्हिडिओ क्लिप बनवून धमकी दिली जात होती़ त्यात २ वर्षे शिक्षा झाली़ .
  • जून २०१७ येरवडा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक दीपक सावंत, हवालदार प्रकाश लंघे, सचिन कदम, प्रदीप शेलार, नयना पुजारी खुन खटला म्हणून गाजलेल्या प्रकरणात ३ आरोपींना फाशीची शिक्षा व आजन्म तुरुंगवासची शिक्षा झाली़ तपास अधिकारी दीपक सावंत यांनी गुन्ह्याचा तपासात प्रामाणिक प्रयत्न केल्याचा निकालपत्रात नमूद केले आहे़ .
  • जून २०१७ - चकलांबा पोलीस ठाणे (बीड) पोलीस उपअधीक्षक ज्योती क्षीरसागर, या गुन्ह्यात मतदानाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन पिडिताचे घर जाळून टाकले़ ४ आरोपींना आजन्म तुरुंगावासाची शिक्षा झाली़ .
  • जून २०१७ अहमदपूर पोलीस ठाणे (लातूर) पोलीस उप अधीक्षक चंद्रकांत एन खांडवी, उपनिरीक्षक अशोक गायकवाड, पंढरी राठोड, एन बी नरहारे, अनैतिक संबंधातून भावाचा खून करण्यात आला होता़ त्यात दोघांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली़ .
  • जुलै २०१७ धारुर पोलीस ठाणे (बीड) पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे, हवालदार ए़ जी़ इनामदार, एस़ डी़ राठोड, पिडित महिलाव तिची अल्पवयीन मुलगी यांच्या सामुहिक अत्याचार करुन खुन केला गेला़ दोन आरोपींना फाशीची शिक्षा झाली़ .
  • जुलै २०१७ मुर्तिजापूर शहर पोलीस ठाणे (अकोला) उपनिरीक्षक श्रीनिवास राठोड, सहायक फौजदार विजय विल्हेकर, हवालदार गणेश पांडे, गोलंदाज लांजेवार, पतीने रॉकेल टाकून जाळून पत्नीचा खुन केला़ यात पतीला जन्मठेपेची शिक्षा झाली़ .
  • आॅगस्ट २०१७ घाटंजी पोलीस ठाणे (यवतमाळ) पोलीस निरीक्षक चंदनसिंह बायस, सहायक निरीक्षक सारंग नवलकर, हवालदार अरुण नागतोडे, गजानन अजमिरे, अशिष भुसारी, जादुदोण्याकरीता देवीला बळी देण्यासाठी ७ वर्षाच्या मुलीचा खुन केला गेला़ यात मुलीचे आईवडिल फितूर झाले असताना ७ आरोपींना फाशीची शिक्षा झाली़ .
  • सप्टेंबर २०१७ हडपसर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, हवालदार एस़ जी़ भगत, व्ही़ एस़ वेदपाठक, अल्पवयीन मुलाचा अनैसर्गिकक कृत्यासाठी खुन केला गेला़ गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन, पुराव्यांची सांगड घालून डीएनए तपासणीद्वारे गुन्हा सिद्ध केला़ खुनाबद्दल मुलाला जन्मठेप आणि त्याला मदत केल्याबद्दल वडिलांना ३ वर्षे शिक्षा झाली़ .
  • आॅक्टोंबर २०१७ येरवडा पोलीस ठाणे (पुणे) पोलीस निरीक्षक संजय पाटील, विलास सोंडे, सहायक निरीक्षक चंद्रकांत जाधव, हवालदार राजाराम घोगरे, तुषार आल्हाट, अनोळखी मृतदेहाची व्हॉटसअपच्या माध्यमातून ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला़ आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली़ . 
  • नोव्हेबर २०१७ बेगमपूरा पोलीस ठाणे (औरंगाबाद) पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात, ए़ एस़ नांदेडकर हवालदार गोकुळ वाघ, रामदास गांडेकर, एस़ एस़ महेर, सुनिल मुळे, अहमदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपी पकडताना आरोपींनी केलेल्या फायरिंगमुळे एटीएसचे पोलीस जखमी झाल्याने गुन्हा दाखल़ या गुन्ह्यात बॅलेस्टिक अहवाल, परिस्थितीजन्य पुराव्याची सांगड घातल्याने दोन्ही आरोपींना १० वर्षे शिक्षा झाली़. 
  • डिसेंबर २०१७, श्रीनगर पोलीस ठाणे (ठाणे) पोलीस उपायुक्त भीमराव सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव देशमुख, सहायक उपनिरीक्षक बाबु चव्हाण, हवालदार अप्पासाहेब चव्हाण, व्ही़ एल़ सानप, एस़ एम़ शेलार, खंडणीची मागणी करुन फायरिंग करुन जखमी केले़ त्यात ५ जणांना ५ वर्षे शिक्षा झाली़. 
  • समर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बाबर यांनी मोबाईलचे सीडीआर प्राप्त करुन त्याचे अ‍ॅनालायसीस करुन त्याद्वारे आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २३ लाख ९८ हजार ६१४ रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, रोकड जप्त केली होती़. 

Web Title: 47 police officers and their team felicitated for good detection of crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.