राज्यात कोरोनाचे ८० हजार २२९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:26 AM2020-06-06T06:26:30+5:302020-06-06T06:26:49+5:30

दिवसभरात वाढले २,४३६ रुग्ण, तर मृतांचा आकडा १३९वर

80 thousand 229 coronavirus patients in the state | राज्यात कोरोनाचे ८० हजार २२९ रुग्ण

राज्यात कोरोनाचे ८० हजार २२९ रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात २ हजार ४३६ रुग्णांची नोंद
होऊन बाधीत रुग्णांची एकूण संख्या ८० हजार २२९ एवढी झाली आहे. १३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २ हजार ८४९ झाला आहे.

शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार
१५६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.८१ टक्के झाले असून मृत्यूदर सातत्याने कमी होत
३.५५ टक्क्यांवर आला आहे. दिवसभरातील १३९ मृत्यूंमध्ये मुंबईतील ५४, ठाणे ३०, वसई-विरार १, कल्याण-डोंबिवली ७, भिवंडी १, जळगाव १४, नाशिक २, मालेगाव ८, पुणे १४, सोलापूर २, रत्नागिरी ५ आणि औरंगाबाद येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये ७५ पुरुष तर ६४ महिलांचा समावेश आहे. ११० जणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते.
आजपर्यंत कोरोना चाचणीचे ५ लाख २२ हजार ९४६ नमुने तपासले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक घरगुती अलगीकरणात आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात मुंबईत सर्वाधिक ५ हजार ७६८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल ठाण्यात ७ हजार १४०, पुण्यात ३ हजार ७६८ आणि पालघरमध्ये ७८० सक्रिय रुग्ण आहेत. याखेरीज, राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण सक्रिय आहे, तर वर्ध्यात २, चंद्र्रपूर ५ आणि नंदूरबारमध्ये ८ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात १ हजार १५० कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या ४६ हजार ८० झाली आहे. तर दिवसभरात ५३ बळी गेले असून कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १ हजार ५१९ जणांना जीवास मुकावे लागले. मुंबईत अजूनही २५ हजार ५३९ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्के असून मृत्यू दर ३.३ टक्के आहे. याशिवाय, १५ मे रोजी शहराच्या रुग्णाच्या दुप्पट वाढीचा दर १२ दिवस होता, तो आता २० दिवसांवर गेला आहे.

Web Title: 80 thousand 229 coronavirus patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.