आरे वाचले! कारशेडऐवजी झाडे लावणार; उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 10:07 PM2020-09-02T22:07:22+5:302020-09-02T22:08:18+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
विशेष प्रतिनिधी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी मेट्रो ३ साठी कोणत्याही परिस्थितीत कारशेड होणार नाही हे स्पष्ट झाले.
गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर होणार नाही याचा उच्चार मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केला होता. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे, असे त्यांनी आजच्या बैठकीत स्पष्ट केले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,दुग्धविकास मंत्री सुनील केदार वन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
Meeting held by CM with Aarey, Forest & Environment Depts. Decision to apply Section 4 of IFA to approximately 600 acres in Aarey land near SGNP taken. This open land will be declared as forest while all rights of Adivasis will be protected: Aaditya Thackery, Maharashtra Minister pic.twitter.com/yfv4B45HOK
— ANI (@ANI) September 2, 2020
आदिवासींचे हक्क अबाधित
राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. राखीव वन क्षेत्राबाबत ४५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील.त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल. सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील. त्याचबरोबर येथील झ।ोड्पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.