खासगी हॉटेलवर थांबा देणा-या चालक-वाहकांवर कारवाई

By Admin | Published: August 13, 2014 03:29 AM2014-08-13T03:29:27+5:302014-08-13T03:29:27+5:30

एसटीच्या चालक-वाहकांकडून खासगी हॉटेलवर अनधिकृत थांबा काही ठिकाणी दिला जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री पडते.

Action on Driver-Carrier Waiting at Private Hotel | खासगी हॉटेलवर थांबा देणा-या चालक-वाहकांवर कारवाई

खासगी हॉटेलवर थांबा देणा-या चालक-वाहकांवर कारवाई

googlenewsNext

मुंबई : एसटीच्या चालक-वाहकांकडून खासगी हॉटेलवर अनधिकृत थांबा काही ठिकाणी दिला जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री पडते. वर्षानुवर्षे ही लूटमार सुरू असताना कुठलेही पाऊल न उचलणाऱ्या एसटी महामंडळाकडून आता थेट एसटी चालक-वाहकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. असे थांबे देणे ही गंभीर बाब असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले.
एसटी गाड्यांचे नसलेले नियोजन, न मिळणाऱ्या सुविधा इत्यादी कारणांमुळे महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न कमी होत आहे. त्याचा फटका महामंडळाला आणि प्रवाशांना बसत असतानाच एसटीच्या दुर्लक्षित कारभाराचा आणखी एक फटका प्रवाशांना बसत आहे. एसटीच्या काही मार्गांवर चालक आणि वाहकांकडून खासगी हॉटेलवर अनधिकृत थांबे देण्यात येतात. यात चालक आणि वाहकांना कमिशन मिळत असल्यानेच हे थांबे देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. एसटीच्या शिवनेरी बसमधून मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर त्याचा सर्वाधिक फटका बसतो. या मार्गावर असणाऱ्या खासगी हॉटेलवर थांबा नसतानाही अनधिकृत थांबा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आता असे अनधिकृत थांबे खासगी हॉटेलवर देणाऱ्या चालक आणि वाहकावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे गोरे यांनी सांगितले. अनधिकृतपणे थांबा देणे चुकीचे आहे. त्यावर कटाक्षाने लक्ष दिले जाईल आणि दोषी आढल्यास नियमानुसार त्या चालक आणि वाहकावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

Web Title: Action on Driver-Carrier Waiting at Private Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.