कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 03:48 PM2024-11-21T15:48:31+5:302024-11-21T15:49:42+5:30

एक्झिट पौलच्या कौलचा विचार करता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात गल्लीपासून ते तांड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात अंदाज बांधले जात आहेत...

Activists think Fadnavis should become CM Chandrashekhar Bawankule's indicative statement regarding the post of Chief Minister | कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान

कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलने महायुतीला कौल दिला आहे. मात्र, नेमके चित्र 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीतूनच स्पष्ट होईल. पण एक्झिट पौलच्या कौलचा विचार करता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास, मुख्यमत्री कोण होणार? यासंदर्भात गल्लीपासून ते तांड्यांपर्यंत संपूर्ण राज्यात अंदाज बांधले जात आहेत. यासंदर्भात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार येण्यासंदर्भात विश्वास व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, "महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सरकार १००% येईल. कारण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा ज्या-ज्या वर्गाला झाला आहे अथवा होणार आहे, तो वर्ग आमच्या बाजूने आहे. वीजबिल माफी मुळे शेतकरी आमच्या बाजूने आहेत, लाडक्या बहिणी आमच्या बाजूने आहेत. गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा, यामुळे जनता आमच्यासोबत आहे." एवढेच नाही तर, "केंद्र आणि राज्य सरकारच्या ५८-५९ योजना सुरू आहेत. त्यामुळे, शहरी वर्गालाही वाटते की केंद्र आणि राज्य सरकार एकत्र राहिले, तर महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होईल," असेही बावानकुळे म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.  

महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडवीस हेच असावेत? असा प्रश्न केला असता, "भाजपच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्केच वाटते की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. राष्ट्रवादीला वाटते की अजित दादा व्हावेत आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे) वाटते की एकनाथ शिंदे व्हावेत. शेवटी निर्णय हा केंद्रीय नेतृत्वाने आणि राज्याच्या तिन्ही नेत्यांनी बसून करायचा असतो. तो होईल," असेही बावनकुळे म्हणाले.


 

Web Title: Activists think Fadnavis should become CM Chandrashekhar Bawankule's indicative statement regarding the post of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.