"यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या..." अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 06:47 PM2021-04-05T18:47:56+5:302021-04-05T18:53:26+5:30

kangana Ranaut slams Anil Deshmukh after Resignation : जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, असे म्हणत कंगना राणौतने अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Actress kangana Ranaut slams Anil Deshmukh after Resignation | "यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या..." अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाचा निशाणा

"यह तो सिर्फ़ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या..." अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाचा निशाणा

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर 2020 मधील तिचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट निलंबित API सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (kangana Ranaut) हिने  अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, असे म्हणत कंगना राणौतने अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (Actress kangana Ranaut slams Anil Deshmukh after Resignation)

कंगनाच्या एका चाहत्याने सप्टेंबर 2020 मधील तिचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील घराची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने व्हिडीओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा टॅग करत कंगनाने ट्विट केले आहे. यामध्ये 'जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय-काय होते...', असे म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे असा हॅशटॅग जोडला आहे.

दरम्यान, कंगना राणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे आपली मतं मांडत असते. 2020 मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अगदी असेही म्हटले होते की, कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळेच  आता राजीनामा दिल्यानंतर कंगनाने अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. याप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टाने अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआयला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचे पत्र, जसेच्या तसे....

प्रति
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आदरणीय महोदय
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.
त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.
सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती
आपला
अनिल देशमुख
 

Web Title: Actress kangana Ranaut slams Anil Deshmukh after Resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.