मेंदी लावल्याने विद्यार्थिनीला एक तास कोंडून ठेवले

By admin | Published: August 13, 2014 03:32 AM2014-08-13T03:32:26+5:302014-08-13T03:32:26+5:30

सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हातावर मेंदी काढल्याने सायन येथील सीबीएम शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला एक तास शाळेत बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

After hatching, she kept the girl for one hour | मेंदी लावल्याने विद्यार्थिनीला एक तास कोंडून ठेवले

मेंदी लावल्याने विद्यार्थिनीला एक तास कोंडून ठेवले

Next

मुंबई : सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हातावर मेंदी काढल्याने सायन येथील सीबीएम शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला एक तास शाळेत बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
सायन कोळीवाडा येथे सीबीएम शाळा आहे. या शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रक्षाबंधनानिमित्त हातावर मेंदी काढली होती. हातावर मेंदी काढल्याने शाळेच्या नियमांचा भंग केल्याने सोमवारी विद्यार्थिनीला शिक्षिकेने शाळेत शिक्षा केली. पहिल्या सत्राची शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनीला शिक्षिकेने एक तास शाळेत बसवून ठेवले. भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार घरी पोहोचताच पालकांना सांगितला.मंगळवारीही शिक्षिकेकडून शिक्षा करण्यात येईल या भीतीने विद्यार्थिनीने वर्गात बसण्यास नकार दिला. या प्रकाराने पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मंगळवारी शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. मुख्याध्यापकांनी झाल्या प्रकाराबद्दल पालकांची माफी मागितली असून यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे आश्वासन पालकांना दिले आहे. गेल्या वर्षीही शिक्षिकेकडून किरकोळ कारणावरून माझ्या मुलीला बैठका काढण्याची शिक्षा देण्यात आली होती. या वर्षीही शाळेने तिला शिक्षा दिली, असे मुलीचे पालक रमेशकुमार ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: After hatching, she kept the girl for one hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.