शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

मेंदी लावल्याने विद्यार्थिनीला एक तास कोंडून ठेवले

By admin | Published: August 13, 2014 3:32 AM

सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हातावर मेंदी काढल्याने सायन येथील सीबीएम शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला एक तास शाळेत बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई : सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हातावर मेंदी काढल्याने सायन येथील सीबीएम शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला एक तास शाळेत बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सायन कोळीवाडा येथे सीबीएम शाळा आहे. या शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रक्षाबंधनानिमित्त हातावर मेंदी काढली होती. हातावर मेंदी काढल्याने शाळेच्या नियमांचा भंग केल्याने सोमवारी विद्यार्थिनीला शिक्षिकेने शाळेत शिक्षा केली. पहिल्या सत्राची शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनीला शिक्षिकेने एक तास शाळेत बसवून ठेवले. भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार घरी पोहोचताच पालकांना सांगितला.मंगळवारीही शिक्षिकेकडून शिक्षा करण्यात येईल या भीतीने विद्यार्थिनीने वर्गात बसण्यास नकार दिला. या प्रकाराने पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मंगळवारी शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. मुख्याध्यापकांनी झाल्या प्रकाराबद्दल पालकांची माफी मागितली असून यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे आश्वासन पालकांना दिले आहे. गेल्या वर्षीही शिक्षिकेकडून किरकोळ कारणावरून माझ्या मुलीला बैठका काढण्याची शिक्षा देण्यात आली होती. या वर्षीही शाळेने तिला शिक्षा दिली, असे मुलीचे पालक रमेशकुमार ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)