मुंबई : पंतप्रधानांनी केलेल्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनामुळे पावर ग्रीडमध्ये बिघाड होऊन देश अंधारत बुडू नये यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पावर सिस्टीम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीओएसओसीओ) वीजनिर्मिती आणि वितरण व्यवस्थेसाठी कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार औष्णिक, जलविद्युत आणि गॅसवर आधारित प्रकल्पांमधून कधी आणि कशा पध्दतीने वीजनिर्मिती, वितरण, फ्रिक्वेन्सी कायम ठेवण्याबाबतच्या सूचनांचे पालन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
२९ मार्च रोजी तारखेला संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी देशातील विजेची मागणी १,०१ ,२०७ मेगावॅट होती. ९ वाजता ती १,१२,५५१ मेगावॅटपर्यंत पोहोचली. त्यावरून या काळातील वाढता विजेचा वापर ११ हजार २०५ मेगावॅट होता. तेवढाच वीज वापर येत्या रविवारी ९ वाजता दिवे बंद केल्यानंतर कमी होईल असा अंदाज आहे. दुसऱ्या एका मांडणीव्दारे वीज वापरात १२ हजार ८७९ मेगावॅट घट होईल असे निरिक्षण आहे. त्यानुसार १२ ते १३ मेगावॅट वीज वापर अचानक कमी होईल असे गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. पीओएसओसीओच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात महापारेषण, महानिर्मिती, महावितरण आणि लोड डिस्पॅच सेंटरने आपल्या कामकाजाचे नियोजन केले आहे. सर्व ठिकाणची घड्याळे भारतीय वेळेनुसार सेट करून घ्या असे सर्वप्रथम बजावण्यात आले आहे. ६. १० मिनिटांपासून ते ८ वाजेपर्यंत जलविद्युत प्रकल्पांतील वीजनिर्मिती कमी करून औष्णिक आणि गॅस प्रकल्पांतील निर्मिती वाढवा आणि मागणी पूर्ण करा.
मागणीनुसार पुरवठा९ वाजून ५ मिनिटांनी औष्णिक प्रकल्पांतील वीजनिर्मिती वाढवत जावी. तसेच, ९ वाजून ९ मिनिटांनी पुन्हा विजेची पूर्ववत झालेली मागणी पूर्ण करावी. त्यापुढे औष्णिक प्रकल्पांच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जलविद्युत प्रकल्प बंद करावेत, असे निर्देश आहेत. फ्रिक्वेन्सीत अचानक वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून रात्री ८.३० पासूनच ही फ्रिक्वेन्सी लघुत्तम म्हणजेच ४९.९० इतकी ठेवणार आहे़