सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हाती घेतलेल्या ‘स्टार रेटिंग प्रोगाम’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी सुचविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांसह राज्यभरात औद्योगिक प्रदूषण कमी करण्यासाठी काय पावले उचलता येतील? याची माहिती ‘स्टार रेटिंग प्रोगाम’च्या माध्यमातून नागरिकांना मिळत आहे. विशेषत: हा उपक्रम डिजिटल आणि टेक्नोसॅव्ही असल्याने, या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासाठीचे सकारात्मक चित्र उभे राहात आहे.
आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर दिवसागणिक प्रदूषणाचे प्रमाणवाढत आहे. वायुप्रदूषणास वातावरणातील धूळ, धूर असे घटक कारणीभूत असतानाच, औद्योगिक प्रदूषणही तेवढेच जबाबदार आहे. परिणामी, अशा औद्योगिक प्रदूषणाची माहिती घेत, त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे, योग्य त्या सूचना देणे आणि टेक्नोसॅव्ही मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अवलंबिला आहे.
संकेतस्थळासह टिष्ट्वटरच्या माध्यमातून प्रदूषण जनजागृतीसह कार्यवाहीसाठी मंडळ कार्यान्वित असून प्रदूषणविरोधात मोहीम उघडण्यात येत आहे. विशेषत: सर्वांना पारदर्शकरीत्या माहिती उपलब्ध असणे. प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनाही सहभाग नोंदवितायावा. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत प्रदूषण कमी करण्यावर भर देणे, यासारखे उपक्रम याद्वारे राबविण्यात येत आहेत.
प्रदूषणास कारणीभूत उद्योगाची मिळणार माहितीराज्यात पुणे, चंद्रपूर आणि औरंगाबाद शहरे अत्यंत प्रदूषित आहेत. पुढील तीन महिन्यांत राज्यातील २६ शहरांत नवे ४० एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग स्टेशन्स बसविण्यात येतील. आपल्या परिसरात कोणता उद्योग सर्वाधिक वायुप्रदूषण करतो, याची तसेच शहराच्या हवा गुणवत्तेबाबतही माहिती मिळेल.संकेतस्थळhttp://mpcb.info/city-rating/
हॅशटॅग#AirPollution#Maharashtra#CleanAirLiveLong#AQLI#CleanAir