Maharashtra Voting 2019: मतदान टक्केवारीत ऐरोलीची आघाडी; मुखेडमध्ये सर्वात कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 10:29 AM2019-10-21T10:29:34+5:302019-10-21T10:32:42+5:30
पावसाचा फटका मतदानाला बसण्याची चिन्हे असून राज्यभरातील दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई: राज्यातील अनेक भागांत कालपासून संततधार कोसळत असून याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सोलापूरमध्ये तर काही मतदानकेंद्रांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने तेथे एकही मतदार फिरकलेला नाही. तर ईव्हीएम बंद पडत असल्याने मतदारांना चिखलात तासंतास खोळंबावे लागत आहे.
मात्र, ऐरोलीमध्ये पाऊस पडत असतानाही मतदारांनी कमालीचा उत्साह दाखविला असून सकाळी 9 वाजेपर्यंत 12 टक्के मतदान झाले. तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड सर्वात कमी दीड टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. नाशिकमध्ये तर एक मत पडले असताना ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता.
पावसाचा फटका मतदानाला बसण्याची चिन्हे असून राज्यभरातील दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उदयनराजे आदी नेत्यांनी मतदान केले.
अकोला:
सकाळी ९ वा. पर्यंतचे मतदान
२८-अकोट- ५.२७%
२९-बाळापूर- ५.०९%
३०-अकोला पश्चिम- ४.४९%
३१-अकोला पूर्व- ५.१९%
३२-मूर्तिजापूर- ५.०४%
ऐरोली मतदार संघात 12 टक्के मतदान
ठाणे - पहिल्या 2 तासात ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडीमधे सुमारे 6 टके मतदान. तर ओवला माजीवडा मधे 5.93 टके मतदानची नोंद.
चोपडा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 3.97% मतदान.
कळवा मुंब्रा मधे - 4.83 टके मतदान.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६४ टक्के मतदान.
मुंबई शहर जिल्हा सकाळी सात ते नऊ या दरम्यान सरासरी पाच टक्के मतदान.
कल्याण पश्चिम : 6.60% मतदान
कल्याण पूर्व मतदारसंघात ८.३४ टक्के मतदान
बीड जिल्हा : सकाळी 9 वाजेपर्यंत 3.24 टक्के मतदान
नाशिक- कळवण - सुरगाणा मतदार संघात 7 ते 9 या दोन तासात 8.74%. मतदान
नाशिक- नाशिक पश्चिम मतदार संघात सकाळी 7-9 यावेळच्या 3.6% टक्के मतदान
जळगाव - जळगाव शहर मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 2.14 % मतदान
ठाणे जिल्ह्यात 4.83 टक्के मतदान
सांगली जिल्ह्यात सकाळी नऊपर्यंत ३.८१ टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये सकाळी 9.00 वाजेपर्यंत 5.13% मतदान
शिरपूर 9 टक्के, धुळे 2.5 टक्के, सिंदखेडा 6.78 टक्के, धुळे ग्रमीणमध्ये 4.74 टक्के मतदान.
रावेर विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.७३ टक्के मतदान
पाचोरा विधानसभा मतदार संघात सकाळी 9 पर्यंत 3.40 टक्के मतदान
उल्हासनगरात सकाळी 9 वाजे पर्यंत फक्त 2.5 टक्के मतदान
बुलडाणा जिल्हा 7 ते 9 वाजेदरम्यान आकडेवारी
21 मलकापूर - 4.48
22 बुलडाणा - 4.61
23 चिखली - 4.57
24 सिंदखेड राजा - 5.09
25 मेहकर - 4.45
26 खामगांव- 5.80
27 जळगांव जामोद - 4.79
एकूण - 4.82
बुलडाणा जिल्हा 7 ते 9 वाजेदरम्यान आकडेवारी
21 मलकापूर - 4.48
22 बुलडाणा - 4.61
23 चिखली - 4.57
24 सिंदखेड राजा - 5.09
25 मेहकर - 4.45
26 खामगांव- 5.80
27 जळगांव जामोद - 4.79
एकूण - 4.82