संतोष येलकर
अकोला, दि. 17 : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दिलासा मिशन, वृक्ष लावून विद्यार्थ्यांना कलेक्टर बंगल्याचे वारसदार होण्याचे आवाहन असो की जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी दुचाकीचा हॉर्न वाजवित आणि सायकल चालवित ग्रामस्थांना शौचालय बांधकामाचे महत्व पटवून देणे, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांचे विविध प्रकारचे फंडे जिल्हावासीयांसाठी कुतुहलाचा विषय ठरले आहेत तशाच प्रकारचे फंडे आता शौचालयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वापरणे सुरू केले आहेत.
दीड वर्षांपूर्वी अकोल्यात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाचा सपाटा सुरु केला. लोकांमध्ये मिसळून, लोकसहभागातून काम करण्याची त्यांची पध्दत जिल्हाभरात परिचित झाली. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनामार्फत ह्यदिलासा मिशनह्ण सुरु केले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध योजनांच्या माध्यमातून कायस्वरुपी दिलीसा देण्याकरिता महत्व