Maharashtra CM Eknath Shinde (Marathi News)मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज महायुतीच्या (Mahayuti) सर्व उमेदवारांनी (Camdidate) अर्ज दाखल (Nomination Form) केले. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांनी सुद्धा राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते, असा असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मिलिंद देवरा यांच्या रुपाने महायुतीचे पारडं जड होणार. त्यांचा सर्व स्तरातील संपर्क आमच्या कामाला येईल. पक्ष मजूत होईल. राज्य सभेच्या खासदारकीमुळे पक्ष मजबूत होईल. दिवगंत बाळासाहेब ठाकरे ठाकरे मुरली देवरा यांचे सुद्धा स्नेहाचं संबंध होते. मुरली देवरा हे महापौर पदाचे उमेदवार होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे आणि देवरा कुटुंबीयांचे ऋणानूबंध होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याचबरोबर, आज मिलिंद देवरा हे शिवसेने उमेदवार आहेत. शिवसेना वाढविण्यासाठी याचा नक्की मदत होईल. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. आमच्याकडे बहुमत आहे. ही निवडणूक बिनविरोधही होऊ शकते. एक उच्च शिक्षित उमेदवार असलेले मिलिंद देवरा यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अनूभव आहे. त्यांचा हा अनूभव राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला मोठे करण्यास नक्कीच मदतीचे ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मिलिंद देवरा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!आज मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी दिली. यामुळे शिंदे साहेबांचे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.