आंबेडकरांची रिंगटोन वाजल्यानं दलित तरुणाला मारहाण

By admin | Published: May 22, 2015 04:29 AM2015-05-22T04:29:48+5:302015-05-22T04:29:48+5:30

मोबाईलवर आंबेडकरांची लागलेली रिंगटोन आधी बंद कर, असे म्हणत आठ जणांनी केलेल्या जबर मारहाणीत एका दलित तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

Ambedkar's ringtones hit the dalit youth | आंबेडकरांची रिंगटोन वाजल्यानं दलित तरुणाला मारहाण

आंबेडकरांची रिंगटोन वाजल्यानं दलित तरुणाला मारहाण

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २२ - मोबाईलवर आंबेडकरांची लागलेली रिंगटोन आधी बंद कर, असे म्हणत आठ जणांनी केलेल्या जबर मारहाणीत एका दलित तरुणाला आपला जीव गमवावा लागला. शिर्डीत ही संतापजनक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
सागर शेजवळ असे मृत दलित तरुणाचे नाव असून तो लग्नाच्या निमित्ताने शिर्डीत आला होता. १६ मे रोजी तो आपल्या दोन भावासोबत जवळच्या बिअर शॉपवर गेला होता. त्याठिकाणी बसल्यानंतर त्याच्या मोबाईलवर आंबेडकरांची रिंगटोन '' तुम्ही करारे कितीही हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला" ही रिंगटोन वाजली. जवळच्या दुस-या टेबलवर बसलेल्या आठ जणांनी सागरला मोबाईल बंद कर असे म्हणत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली व मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करणारे युवक एवढयावरच थांबले नाहीत तर त्यांनी सागरला मोटारसायकलला बांधून जवळच्या जंगलात नेले. सागरच्या नातलगांनी पोलिसांच्या मदतीने शोधाशोध केल्यानंतर सागरचा मृतदेश सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुई गावाजवळ सापडला. सागरचा मृतदेह हा नग्न अवस्थेत होता तसेच त्याच्या शरिरावर जवळपास २५ जखमा होत्या. शरिरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने सागरचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट करण्यात आले. बिअर शॉपवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी विशाल कोटे, सोमनाथ वाडेकर, रुपेश वाडेकर आणि सुनील जाधव या चार जणांना अटक केली. या सर्व आरोपींविरुध्द कलम ३०२, ३९५, २०१, ९०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी दिली.

 

Web Title: Ambedkar's ringtones hit the dalit youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.