शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

आंबेडकरांची रिंगटोन वाजल्यानं दलित तरुणाला मारहाण

By admin | Published: May 22, 2015 4:29 AM

मोबाईलवर आंबेडकरांची लागलेली रिंगटोन आधी बंद कर, असे म्हणत आठ जणांनी केलेल्या जबर मारहाणीत एका दलित तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. २२ - मोबाईलवर आंबेडकरांची लागलेली रिंगटोन आधी बंद कर, असे म्हणत आठ जणांनी केलेल्या जबर मारहाणीत एका दलित तरुणाला आपला जीव गमवावा लागला. शिर्डीत ही संतापजनक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. सागर शेजवळ असे मृत दलित तरुणाचे नाव असून तो लग्नाच्या निमित्ताने शिर्डीत आला होता. १६ मे रोजी तो आपल्या दोन भावासोबत जवळच्या बिअर शॉपवर गेला होता. त्याठिकाणी बसल्यानंतर त्याच्या मोबाईलवर आंबेडकरांची रिंगटोन '' तुम्ही करारे कितीही हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला" ही रिंगटोन वाजली. जवळच्या दुस-या टेबलवर बसलेल्या आठ जणांनी सागरला मोबाईल बंद कर असे म्हणत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली व मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करणारे युवक एवढयावरच थांबले नाहीत तर त्यांनी सागरला मोटारसायकलला बांधून जवळच्या जंगलात नेले. सागरच्या नातलगांनी पोलिसांच्या मदतीने शोधाशोध केल्यानंतर सागरचा मृतदेश सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुई गावाजवळ सापडला. सागरचा मृतदेह हा नग्न अवस्थेत होता तसेच त्याच्या शरिरावर जवळपास २५ जखमा होत्या. शरिरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने सागरचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट करण्यात आले. बिअर शॉपवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी विशाल कोटे, सोमनाथ वाडेकर, रुपेश वाडेकर आणि सुनील जाधव या चार जणांना अटक केली. या सर्व आरोपींविरुध्द कलम ३०२, ३९५, २०१, ९०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी विवेक पाटील यांनी दिली.