महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर कमालाचे अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळे व्हि़डीओ, फोटो शेअर करत ते अनेकदा कार बक्षिस देण्याची किंवा थेट कंपनीत नोकरी देण्याची ऑफर देतात. यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. मात्र, त्यांनी पोस्ट केलेला एक फोटो वादात सापडल्याने ते ट्विट डिलीट करावे लागले आहे.
आनंद महिंद्रा यांनी कोरोनाच्या काळात अन्य लोक कपड्याचे मास्क लावून फिरत असताना एका दुर्गम भागातील मुलगी आणि तिच्या कडेवर असलेला छोटा भाऊ पानाचा मास्क बनवून तो तोंडावर लावलेला फोटो पोस्ट केला होता. यावरून आनंद महिंद्रा ट्रोल झाले. त्यांच्या ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता सरळ माफी मागत ट्विट डिलीट केले. तसेच ही चूक लक्षात आणून देणाऱ्या युजरचेही त्यांनी आभार मानले.
खरेतर हा फोटो आक्षेपार्ह नव्हता. मात्र, आनंद महिंद्रांनी या फोटोला जी ओळ लिहिलेली ती लोकांना आव़डली नाही. ''मला माहिती नाही हा फोटो कुठे काढण्यात आला. मात्र, हा फोटो कोरोना व्हायरसच्या आठवणींच्या क्षणांमध्ये प्रभावशाली बनणार आहे. हा फोटो केवळ मास्क इंडियासाठी नाही, तर ग्रीन वर्ल्डसाठीही आहे. त्यासोबतच एक आठवणही करून देत आहे, की निसर्गाने आम्हाला सारे काही दिले आहे ज्याची आम्हाला गरज आहे.''
या त्यांच्या ट्विटवरून नेटकऱ्यांनी आनंद महिंद्रांना झापायलाच सुरुवात केली. एका महिलेने त्यांना उद्देशून अशाप्रकारचे मास्क सुरक्षा देते याचे कोणतेही पुरावे नाहीत. हे पर्यावरणासाठी जागरुकता दाखविण्यासाठीही नाहीय. तर हे लोक असे पानाचे मास्क वापरत आहेत कारण त्यांचा जीव वाचविण्यासाठी सरकारने मास्क पोहोचवलेले नाहीत.
असे अनेक ट्विट पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांच्या ही चूक लक्षात आली. त्यांनी लगेचच ते ट्विट डिलीट करत माफी मागितली. तसेच माझे ट्विट परिस्थितीच्या असमतोलपणाला कसे असंवेदनशील दाखवत आहे हे मी पाहतोय. मी ते हटविले आहे. यावरही लोकांनी आनंद महिंद्रांची स्तुती केली आहे. तुमच्यामध्ये संवेदनशीलता आहे. खूप कमी लोक असे विनम्र असतात, असे एका युजरने म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या वाचा...
छत्तीसगडमध्ये आकाशातून घरांवर 'गोळीबार'; छपराच्या चिंधड्या उडाल्या
कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला
CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक
CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन
एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले