- सोनाली देसाई
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि २७ - ट्रान्सजेंडर, किन्नर, हिजडा, तृतीयपंथीय या प्रकारांबाबत पूर्णपणो अनभिज्ञ असलेलं एक बालपण मी जगत होतो. मात्र मुलगा असूनही मला वयाच्या 6-7 वर्षापासून आईचे कपडे, तिची ज्वेलरी, सौंदर्यप्रसाधने वापरणो आवडायचे. माझे हावभावही बायकी होउ लागले. साधारण 15 वर्षार्पयत मी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिस:या वेळी जेव्हा मला मृत्यूने जवळ केले नाही तेव्हा आयुष्याला कलाटणी मिळाली. ‘चला तर आता जगून पाहू’ या द्ष्टिकोनातून माझा नवीन प्रवास सुरु झाला.
सुंदर गुलाबी रंगाची, चंदेरी बिटवर्क केलेली, मेहंदी हेअर कलर, हातात गोल्डन बांगडय़ा भरलेली अभिना अहेर संवाद साधत होती. अहेर ही मुंबईतील असून आज तिने आपले अनुभव पणजीतील एका कार्यक्रमात मांडले. अभिना सांगते, सुरवातीला 9 वर्षे मी आईला माझ्यातील बदलणा:या भावना लपवून ठेवल्या. मात्र त्यानंतर आईला सांगावेच लागले. माझी आई सिंगल वुमन होती. तिने मला समजून घेतले. मला सहकार्य केले. माझे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून तिने मला माझ्या भावनांसकट स्विकारले आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यास पाठिंबा दिला. मी सोफ्टवेअर इंजिनियरची पदवी घेतली. अभिजित आहेरचा प्रवास येथे संपुष्टात येतो. त्यानंतर मी माझी वेगळी ओळख समाजासमोर आणली आणि ती प्रयत्नपुर्वक रुजवली. या प्रवासात बराच त्रस झाला. अनेक वाईट प्रसंगाना तोंड द्यावे लागले मात्र आजच्या तारखेला हा प्रवास अभिनाने जिंकला आहे, असे ती अभिमानाने सांगते.
आज अभिना अहेर ट्रन्सजेंडर कम्युनिटीची ‘रोल मॉडेल’ बनली आहे. तृतीयपंथीयांच्या वाटय़ाला येणा:या समस्यांना आणि पुढच्या पिढीला हक्काचे व्यासपीठ मिळाव, त्यांना शासकीय क्षेत्रत, समाजात, शैक्षणिक क्षेत्रत मानाचे स्थान मिळावे म्हणून अभिनाचा लढा सुरु आहे. या संघर्षात देशातील विविध राज्यातील तृतीयपंथीयांना ती एकत्रित करत आहे. त्यांची समूह तयार करत आहे. आत्मसन्मानाने जगण्यासाठी तृतीयपंथीयाला शिक्षणाची गरज आहे, असे तिचे स्पष्ट मत आहे.
व्हाईट हाउजला भेट
स्वत: सोफ्टवेअर इंजिनिअर असलेली अभिना ‘व्हाईट हाउसला’ भेट देउन आली आहे. प्रत्यक्ष ओबामांची भेट घेता आली नसली तरी त्यांच्या राजदूतांना ती भेटली आहे. ट्रान्सजेंडरबाबत भारतात कशा पद्धतीचे काम सुरु आहे आणि कितपत विकास होत आहे याबाबत चर्चा करण्यात आली. व्हाईट हाउसमध्ये ट्रान्सजेंडरसाठी खास शौचालयाची सोय आहे हेही तिने लोकमतशी बोलताना नमूद केले. व्हाईट हाउसला भेट हा माङयासाठी एक अविस्मरणीय प्रसंग आहे.
गेल्या 10 वर्षातील बदल
तृतीयपंथीय समाजाच्या समस्या वेगळय़ा आहेत. गेल्या दहा वर्षात कायद्याच्या दृष्टिकोनातून आमच्या समस्यांकडे पाहण्याची मानसिकता तयार झाली आहे. तृतीयपंथीयांसाठी धोरण अस्तित्वात आले आहे. शारिरीक सुखासाठी तृतीयपंथीयांचा वापर यावर नियंत्रण आले आहे. सार्वजनिक जागांवर फिरण्यासाठीचे स्वातंत्र्य मिळत आहे. काही प्रमाणात समाजाची आमच्याकडे पाहण्याची दृष्टि बदलत आहे. मात्र अजूनही 68 टक्के तृतीयपंथीयांना अहवेलना आणि समस्यांचा सामना करावा लागतो, अशी वेदना तिने मांडली.
गोव्यात हॉटेलसाठी थांबावे लागले पाउणतास
मी या कार्यक्रमासाठी गुरुवारी गोव्यात आले. कळंगुट येथील एका हॉटेलात उतरले. मात्र हॉटेलवाल्यांनी मला प्रवेश द्यावा की नाही या निर्णयासाठी पाउणतास खोळंबत ठेवले. मला गोव्यातील कार्यक्रमात बोलावणो आले असून ती प्रतिनिधी म्हणून आले असल्याचे सांगितल्यानंतर बराच वेळ विविध प्रश्न, तपासणी केल्यानंतर त्यांनी मला हॉटेलमध्ये प्रवेश दिला. माझ्यासारख्या उच्चशिक्षित अहिनावर असे प्रसंग येत असतात तर सर्वसामान्यात जगणा:या माझ्या बहिणींना काय काय सहन करावे लागत असेल याचा विचारही करता येत नाही, असे ती म्हणाली.