Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:16 PM2024-11-23T18:16:30+5:302024-11-23T18:16:30+5:30

Maharashtra Assembly Election Result 2024: राज्यातील निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. यानंतर अशोक चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत विरोधकांना जोरदार टोला लगावला.

Answer to those who try to defame BJP and Grand Alliance bjp mp Ashok Chavan | Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला

Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला

Maharashtra Assembly Election Result 2024: राज्यातील निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. या निवडणुकांमध्ये महायुतीला २३२ जागांवर दणदणीत विजय मिळताना दिसत असून महाविकास आघाडीला मात्र ५२ जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं चित्र दिसतंय. संपूर्ण चित्र अवघ्या काही वेळात स्पष्ट होईल. महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. "केवळ भोकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची लाट आहे. लोकांनी भरभरून महायुतीला मतं दिली. विरोधकांनी ज्या प्रकारे अपप्रचार करून भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय, त्याला हे सडेतोड उत्तर मतदारांनी दिलंय," अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

"घटकपक्षांनी एकमेकांना सहकार्य करून एकजुट दाखवली. फडणवीस असतील, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या आमच्या नेत्यांनी एकजुट दाखवली आणि महत्त्वाचे निर्णय घेतले त्याचा फायदा सामान्यांना विशेष करून महिलांना, तरुणांना, शेतकऱ्यांना आणि सामान्यांना झाला. विरोधकांकडे आता नेता शिल्लक नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे," असं म्हणते चव्हाण यांनी टीकेचा बाण सोडला.

"नांदेड किंवा भोकरवर अधिक लक्ष केंद्रित करण्यापेक्षा काँग्रेसनं जर महाराष्ट्रावर अधिक लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती. तेलंगणाचा जो प्रयत्न झाला, ज्या प्रकारे तेलंगणाची जी धनशक्ती भोकरमध्ये वापरली गेली ती लोकांत पसंत आलेली नाही. खऱ्या अर्थानं तेलंगणाच्या धनशक्तीवर महाराष्ट्राच्या जनशक्तीचा विजय असल्याचं माझं मत आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

ज्या ज्या वेळेस पराभव होतो...

"ज्या ज्या वेळी पराभव होतो, तेव्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्या म्हणतात. सोयीप्रमाणे अशी वक्तव्य केली जातात. महाराष्ट्रात निवडणुका पारदर्शक पद्धतीनं झालीयेत, त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही," असं म्हणत अशोक चव्हाणांनी विरोधकांना उत्तर दिलं.

Web Title: Answer to those who try to defame BJP and Grand Alliance bjp mp Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.