Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:00 PM2022-06-18T19:00:39+5:302022-06-18T19:01:00+5:30

Appasaheb Deshmukh ED: श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली.

Appasaheb Deshmukh arrested by ED in money laundering case treasurer of shri chhatrapati shivaji education society | Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी अप्पासाहेब देशमुखांना ईडीकडून अटक

Next

Appasaheb Deshmukh ED: मनी लाँड्रिंग प्रकरणी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सक्तवसूली संचलनालयानं (ED) ही कारवाई केली. त्यांनी एमएलए न्यायालयानं २४ जूनपर्यंत ईडीकडे कोठडी सुनावली आहे.

यापूर्वीही ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई करत श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता अप्पासाहेब देशमुखांना अटक करण्यात आली. महादेव देशमुख आणि अप्पासाहेब देशमुख हे भाऊ आहेत. मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देत त्यांच्याकडून प्रवेशासाठी पैसे गोळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.


श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर संस्थेला २०१२-१३ आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी २०० विद्यार्थ्यांसाठी एबीबीएसचा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. २०१४ मध्ये मात्र प्रवेश प्रस्ताव फेटाळण्यात आला. २०० प्रवेशाची परवानगी असताना २०० ऐवजी ५५० विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करण्यात आले आणि त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच नाही. प्रवेश आणून देण्यासाठी एका एजन्टचीही नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष महादेव देशमुक आणि इतरांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Appasaheb Deshmukh arrested by ED in money laundering case treasurer of shri chhatrapati shivaji education society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.