आरिफ माजिदला देणार मानसोपचार

By admin | Published: December 3, 2014 03:53 AM2014-12-03T03:53:20+5:302014-12-03T03:53:20+5:30

इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेतून परतलेला कल्याणमधील तरुण आरिफ माजिद याने तपास यंत्रणांना दिलेली माहिती उलटसुलट

Arif will give maizadala mental treatment | आरिफ माजिदला देणार मानसोपचार

आरिफ माजिदला देणार मानसोपचार

Next

डिप्पी वांकाणी, मुंबई
इराकमधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेतून परतलेला कल्याणमधील तरुण आरिफ माजिद याने तपास यंत्रणांना दिलेली माहिती उलटसुलट आणि असंबद्ध असल्याने त्याला मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार देणार असल्याची माहिती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सूत्रांनी दिली. तसेच त्याला तपासादरम्यान घरचे जेवण देण्याची आणि कुटुंबीयांशी भेटण्याची सवलतही देण्यात आली आहे. आरिफने भारतात परत येणे ही आपली मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.
आरिफच्या विचारांत मोठी अस्ताव्यस्तता दिसून येत आहे. त्याने दिलेल्या माहितीत मोठी विसंगती आहे आणि तर्कसंगतीचा अभाव आहे. तो बराचसा संभ्रमावस्थेत
आहे. त्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञांकरवी उपचार देण्यात येणार आहेत. त्यानंतरच त्याच्या विचारांत सुस्पष्टता आणि तर्कसंगती येईल, असे सूत्रांनी सांगितले. आरिफने सांगितले की, त्याला युद्धक्षेत्रात फुटकळ कामे दिल्याने आणि त्याच्या आईने परत येण्यासाठी भुणभुण लावल्यानेच तो परत आला. पण परत येणे ही त्याच्या मते मोठी चूक होती. इस्लामिक स्टेटला पैशांची कमतरता नसून ते बॉम्ब बनवण्याचे तंत्र मिळवण्यासाठी इंजिनीअर्सना भरमसाठ पैसा देत आहेत. दरम्यान, आरिफच्या काकांना मंगळवारी एनआयएच्या खंबाला हिल भागातील कार्यालयात तपासासाठी बोलावले होते. आरिफला सुनावणीवेळी म्हणणे मांडण्यास मदत घेण्यासाठी कुटुंबीयांतर्फे वकिलाची नेमणूक केली जाईल का, असे विचारता त्यांनी नाही असे सांगितले.

Web Title: Arif will give maizadala mental treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.