अजय चोरडिया आत्महत्याप्रकरण : चिठ्ठीतील मजकुरात उल्लेख; 5 कोटीसह सदनिका घेतली
पिंपरी : माङया आत्महत्येस एकमेव व्यक्ती म्हणजेच आशिष शर्मा हे जबाबदार आहेत. त्यांनी माङयाकडून पाच कोटी रूपये घेतले. तसेच बाणोर येथे सदनिकाही घेतली, असा उल्लेख पंचशील ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अजय ईश्वरदास चोरडिया यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. चोरडियांजवळ सापडलेली चिठ्ठी माध्यमांच्या हाती लागली असली, तरी या चिठ्ठीसंदर्भात अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली आहे. तपास सुरू आहे, असे म्हणून कानावर हात ठेवले आहेत. अधिकृत दुजोरा दिला नसला तरी खंडनही केलेले नाही.
चिंचवड येथील डबल ट्री हिल्टन या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी अजय चोरडिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पिंपरी-चिंचवड आणि पुणो शहरात अजय चोरडियांचे प्रशासकीय, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रतील मान्यवरांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे अजय यांनी आत्महत्या का केली असावी, याविषयीची चर्चा उद्योग-व्यवसायात होती. आत्महत्येऐवजी पोलिसांनी आकस्मिक नोंद केली होती. व्हिसेराही राखून ठेवला आहे.
घटनेच्या तीन दिवसांनंतरही पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावण्यात यश मिळालेले नाही. मात्र, माध्यमांच्या प्रतिनिधींना दोन पानांची चिठ्ठी मिळाली आहे. मात्र, पोलीस याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. हॉटेलमध्ये असणा:या नोट पॅडच्या पानावर इंग्रजीत लिहिलेली ती चिठ्ठी आहे. पानावर हॉटेलचा लोगो आहे. चिठ्ठीतील संबंधित आशिष शर्मा कोण, याचा तपास घेणो पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. अडीच वर्षापूर्वी आशिष शर्मा हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते. त्यांचे आणि अजय यांचे काहीसंबंध होते का? विविध प्रशासकीय अधिका:यांशी अजय यांचा संबंध असल्याने त्या शर्माशी त्यांचा काही संबंध आहे का? किंवा व्यावसायिक किंवा अन्य कोणत्या क्षेत्रतील व्यक्तीशी संबंधित आहे, याचाही तपास करणो पोलिसांपुढे आव्हान आहे.
या विषयी परिमंडळ तीनचे उपायुक्त पोलीस उपायुक्त राजेंद्र माने म्हणाले, ‘‘अजय चोरडिया यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अजूनही त्यांचे घरातील सदस्य विविध विधी करण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे सर्वाचे जबाब घेतलेले नाहीत. चिठ्ठीचाही एकत्रित तपास सुरू आहे.’’
त्या फोनचीही तपासणी
आत्महत्येपूर्वी एका सनदी अधिका:यास दूरध्वनी केला होता. मी आत्महत्या करणार आहे, अशी माहितीही त्यांना दिली होती. मात्र, संबंधित व्यक्तीने अजयचे म्हणणो गांभीर्याने घेतले नव्हते. तेव्हा भेटू वैकुंठात असा संवाद झाला होता, अशी चर्चा होती. याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अजय हे पंचशील ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ईश्वरदास चोरडिया यांचे द्वितीय पुत्र होते. पंचशील ग्रुप नावाने त्यांचा बांधकाम व्यवसाय असून पुणो आणि पिंपरी- चिंचवड परिसरात अनेक पंचतारांकित हॉटेल्सही आहेत. ईश्वरदास चोरडिया हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाविद्यालयीन जीवनात वर्गमित्र आहेत. पवार कुटुंबियांशी त्यांचे अत्यंत निकटचे कौटुंबिक आणि व्यावसाईक संबंध आहेत. अजय यांच्या अंत्यसंस्काराला मंगळवारी शरद पवार उपस्थित होते.
मला या संदर्भात एक-दोन फोन आले आहेत. पण त्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. पिंपरी-चिंचवडला अडीच वर्षापूर्वी आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतरच्या कालावधीत मी कोणालाही भेटलो नाही किंवा या शहराशी माझा काहीही संबंध राहिला नाही. जेवढा काळ मी पदावर होतो. त्या काळात मी जी कामे केली ती नियमात बसवून केली आहेत.
-आशिष शर्मा, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त
आणि महापारेषणचे संचालक
4आशिष शर्मा यांनी माङो जीवन उध्वस्त केले आहे. त्यांनी माङयाकडून पाच कोटी आणि बाणोर येथे सदनिका घेतली. ते एकटेच माङया आत्महत्येला जबाबदार आहेत.
4दुस:या पानावर कुटुंबातील सदस्य अतुल, मित्र डिग्गी आणि पत्नी मोनिका, मुलगा प्रतीक, मुलगी प्रियंका यांनाही लिहिले आहे. आशिषला सोडू नका. तसेच संजीव, देव, पीपी यांनी माङया मुलाची काळजी घ्या. प्रियंका माझी आठवण काढू नकोस. प्रतीक, मी तुला बेवकुफ म्हणत असलो, तरी खूप प्रेम करतो. मोनिका, तू माझी स्वपAपरी आहे. आय लव्ह यू.’’ असे लिहून गुडबाय केले.