औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर फटाका मार्केटला शनिवारी लागलेल्या आगीचे गूढ कायम आहे. या आगीचे नेमके कारण काय, या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिली ठिणगी कुठून पडली, याचा तपास रविवारी सकाळी विद्युत निरीक्षकांच्या पथकाने सुरू केला आहे.विद्युत निरीक्षक ए. एच. मुजावर यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करताना काही पुरावे ताब्यात घेतले. पुरावे संकलित करण्याबरोबरच प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाब नोंदविल्यानंतरच ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. सध्या तरी या घटनेबाबत लगेचच काहीही सांगता येणे शक्य नाही. चार ते आठ दिवसांत पाहणी अहवाल तयार होऊ शकतो, असे मुजावर यांनी सांगितले.फटाका मार्केटमध्ये दिवसा वीजपुरवठा बंद करण्यात येतो. महावितरणने तेथे बसवलेले मीटर तसेच त्याचे कंडक्टरही सुस्थितीत आहे. शॉर्टसर्किट झाले असते तर हे दोन्ही जळाले असते. तरीही सद्य:स्थितीत ठामपणे काहीही सांगता येणे शक्य नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
औरंगाबादच्या आगीचे गूढ कायम
By admin | Published: October 31, 2016 5:17 AM