‘पौरुषत्व’ चाचणी करण्यास ‘त्या’अधिकाऱ्याचा नकार
By admin | Published: April 2, 2015 02:54 AM2015-04-02T02:54:35+5:302015-04-02T02:54:35+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी मारोती हरी सावंत (५९) याने ‘पौरुषत्व
पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी मारोती हरी सावंत (५९) याने ‘पौरुषत्व’ चाचणी करून घेण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी बुधवारी दिला.
सावंत हा महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा महासंचालक होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या शाळेतील मुख्यध्यापिकेने सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावंत हा अल्पवयीन मुलींना फ्लॅटवर बोलवून चॉकलेट खाण्यास देत असे. त्यानंतर अश्लील चाळे करत असल्याचे मुलींनी सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यातील एका १३ वर्षांच्या मुलीवर सावंत हा गेल्या तीन वर्षांपासून शारिरीक संबध ठेवत असल्याचे निष्पन्न झाले.
सावंतला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. बलात्काराच्या गुन्ह्यात महत्त्वाची असणारी ‘पौरुषत्व’ चाचणी (पोटेन्सी टेस्ट) देण्यास सावंतने नकार दिल्याचे तपास अधिकाऱ्यांनी व सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले. परंतु संमती व जबाबदारी पत्रावरील मजकूर मान्य नसल्याने डॉक्टरांच्या अर्जावर सही करण्यास सावंतने नकार दिल्याचे यावेळी न्यायालयात सांगण्यात आले. (प्रतिनिधी)