थकबाकीदारांत गृहविभाग कायम
By admin | Published: March 2, 2015 02:22 AM2015-03-02T02:22:57+5:302015-03-02T02:22:57+5:30
राज्य शासनाच्या विभागांना देण्यात येणाऱ्या सवलतींचे ओझे बरेच मोठे असल्याने त्याची थकबाकी पूर्ण करण्यात यावी, अशी
मुंबई : राज्य शासनाच्या विभागांना देण्यात येणा-या सवलतींचे ओझे बरेच मोठे असल्याने त्याची थकबाकी पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी एसटी महामंडळाकडून सातत्याने केली जात आहे. शासनाच्या गृह विभागाचीही यात तुटपुंजी अशी थकबाकी असून, ही थकबाकी पूर्ण करायची सोडून थकबाकीदारांच्या यादीत कायम राहण्याचे काम गृह विभागाने केले आहे. ३ कोटी ८ लाख ७२ हजार ८१७ रुपयांपैकी १ कोटी १ लाख १५ हजार रुपये देण्याचे शासनाने मान्य केले आहे.
एसटी महामंडळाकडून राज्य शासनाच्या २५ विभागांना सवलती देण्यात येतात. यामध्ये शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, गृह विभागासह अन्य विभागांचा समावेश आहे. या सर्व विभागांकडून जवळपास २ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम येणे बाकी आहे. यामध्ये गृह विभागाची थकीत रक्कम ही कमी आहे. आपल्या विविध कामांसाठी राज्यातील
पोलीस कर्मचारी एसटी महामंडळाच्या बसचा वापर करतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीबरोबरच कैद्यांची ने-आणही केली जाते. यांच्या प्रवास खर्चाची रक्कम कारागृह विभागाकडून एसटी महामंडळास अदा केली जाते. (प्रतिनिधी)