नाशिक मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीवरून बाळासाहेब थोरात आक्रमक, राज्य सरकारला धरलं धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 01:31 PM2023-07-25T13:31:54+5:302023-07-25T13:32:56+5:30

Balasaheb Thorat : मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले.

Balasaheb Thorat aggressive over the traffic jam on the Nashik Mumbai route, held the state government on edge | नाशिक मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीवरून बाळासाहेब थोरात आक्रमक, राज्य सरकारला धरलं धारेवर

नाशिक मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीवरून बाळासाहेब थोरात आक्रमक, राज्य सरकारला धरलं धारेवर

googlenewsNext

मुंबई - नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले. आमदार रईस शेख यांनी नाशिक मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता, तरी मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

थोरात म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव धुळे अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबई मध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. मंत्री छगनराव भुजबळ, दादा भुसे अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? मंत्री महोदयांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता. 

थोरात पुढे म्हणाले, एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. ॲम्बुलन्स मला या प्रवासात वाहतूक कोंडी मध्ये अडकलेल्या दिसल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल, मंत्रिमहोदय उत्तरात सांगतात की ऑगस्ट 2024 पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील. मंत्री महोदय असे चालणार नाही हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील.

यावर मंत्री महोदय दादा भुसे यांनी, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कुंडीचा आढावा घेतला आहे तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करून आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान 50 टक्के बदल झालेला दिसेल असे सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री महोदयांना सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.

Web Title: Balasaheb Thorat aggressive over the traffic jam on the Nashik Mumbai route, held the state government on edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.