‘स्टिंग’पासून सावधान!

By admin | Published: June 5, 2014 12:18 AM2014-06-05T00:18:16+5:302014-06-05T00:18:16+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळ सहका:यांना स्टिंग ऑपरेशन वा सरकारला बदनाम करू शकणा:या तत्सम गोष्टींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आह़े

Be careful of 'sting'! | ‘स्टिंग’पासून सावधान!

‘स्टिंग’पासून सावधान!

Next

 मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र : रात्रीभोजनादरम्यान सहका:यांशी साधला संवाद

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळ सहका:यांना स्टिंग ऑपरेशन वा सरकारला बदनाम करू शकणा:या तत्सम गोष्टींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आह़े गत रविवारी मोदींची आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांसोबत मॅरॉथॉन बैठक पार पडली़ यावेळी मोदींनी आपल्या सर्व मंत्र्यांना हा कानमंत्र दिला़
मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना दिलेल्या रात्रीभोजनादरम्यान मोदींनी सर्वाशी संवाद साधला़ पहिल्यांदा मंत्री किंबहुना खासदार झालेले तसेच निर्मला सीतारामन यांच्यासारख्या काही खासदारही नसलेल्या आपल्या मंत्रिमंडळ सदस्यांना त्यांनी अनेक कानमंत्र दिल़े विरोधकांच्या ‘डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट’कडून सरकार व पक्षाला बदनाम करण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात, असे मोदींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितल़े एका स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलेल्या बंगारू लक्ष्मण यांच्यामुळे पक्ष आणि सरकारला सामोरे जावे लागलेल्या बदनामीचीही त्यांनी यावेळी आठवण करून दिली़ शानदार विजयाने डोक्यात हवा शिरू देऊ नका़ काँग्रेस आणि अन्य अजूनही हा विजय पचवू शकलेले नाहीत़ ते आपल्या मागावर असतील़ संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याला फारसा भाव देऊ नका, असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केल़े एकंदर आपला अजेंडा लागू करण्याच्या दिशेने पाऊल टाकलेल्या मोदींनी कुठल्याही स्थितीत वाद नको आहे, हे मंत्रिमंडळासोबतच्या चर्चेतून स्पष्ट झाले आह़े म्हणूनच 1977 मधील ऐतिहासिक जनाधारानंतरही मोरारजी देसाई सरकारला वाद कसा नडला होता, याचे स्मरण त्यांनी आपल्या सहका:यांना करून          दिल़े केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या कुठल्याही नातेवाईकाच्या वा मित्रंच्या हितापेक्षा नोकरशाही सक्षम करण्यास, त्यांच्या जनहिताच्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी बजावल़े आपले ध्येय साधण्यासाठी तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांची मदत घेण्याची मुभाही त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिली़ लोक तुमचे काम आणि त्याची पोच यावरून  तुमचे मूल्यमापन करणार आहेत तुमच्या भाषणांवरून नव्हे, असेही मोदी  म्हणाले.
 
4लोकांनी पक्षावर अभूतपूर्व विश्वास टाकून ऐतिहासिक विजय मिळवून दिला आह़े जनतेच्या अपेक्षांवर आपल्याला खरे उतरायचे आह़े अशा स्थितीत कुठल्याही वादात, सापळ्यात किंवा टेलिफोन टॅपिंगमध्ये अडकून आपल्या यशावर पाणी फेरू नका, याबाबतही त्यांनी आपल्या मंत्र्यांना सतर्क केल़े
4या अनौपचारिक चर्चेदरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे आपले अनेक अनुभव व काही राजकीय किस्से त्यांनी यावेळी सांगितल़े केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि अर्थमंत्री अरुण जेटली हेही यावेळी भरभरून बोलल़े एका वृत्तवाहिनीने भाजपा व तत्कालीन सत्तारूढ काँग्रेस पक्षाला कसे डबल क्रॉस केले होते, तो किस्सा जेटलींनी ऐकवला़

Web Title: Be careful of 'sting'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.