बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वर्ष २०१५-१६ च्या उपक्रमांची सुरुवात

By admin | Published: December 19, 2014 04:34 AM2014-12-19T04:34:33+5:302014-12-19T04:34:33+5:30

बौद्ध धम्मातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ शैक्षणिक संस्था सुरू करण्याची नितांत गरज असल्याने बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वतीने

Begish International's 2015-16 initiative | बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वर्ष २०१५-१६ च्या उपक्रमांची सुरुवात

बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वर्ष २०१५-१६ च्या उपक्रमांची सुरुवात

Next

औरंगाबाद : बौद्ध धम्मातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ शैक्षणिक संस्था सुरू करण्याची नितांत गरज असल्याने बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या वतीने राज्यभर शाखा उघडून सर्वोपयोगी शिक्षण देण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. पी.आर. ढाले यांनी सांगितले.
सध्याच्या शासनाच्या धोरणानुसार स्व-अर्थसाहाय्य संचलित शाळा सुरू करण्यासाठी जवळपास ३० लाखापर्यंत खर्च येतो. एवढा खर्च बौद्ध धम्मासारख्या अल्पसंख्याक समाजाला परवडणारा नाही. बौद्ध धम्मीयांना शिक्षण मिळावे म्हणून दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चौका, औरंगाबादच्या वतीने अर्थसाहाय्य करून वर्ष २०१५-१६ साठी राज्यभर शाखा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
इच्छुकांना यासंदर्भात सविस्तर माहिती मिळावी म्हणून २१ डिसेंबर रोजी ‘शाखा देणे मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. तसेच विज्ञाननिष्ठ शिक्षणावर सल्लामसलत करण्यासाठी बुद्धिस्ट कर्मचारी, इंजिनिअर्स, डॉक्टर्स, फार्मसी, आॅफिसर्स, टीचर्स, पत्रकार, भिक्खू संघ यांच्या बैठकीचेही फेब्रुवारी व मार्चमध्ये आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या राज्यातील जवळपास १५० शाखांमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते १० वी वर्गांसाठी प्रवेश देणेही सुरू करण्यात आल्याचे अ‍ॅड. ढाले यांनी सांगितले.

Web Title: Begish International's 2015-16 initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.