भिशीलाही बसला लॉकडाऊनचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:41 AM2020-06-02T04:41:24+5:302020-06-02T04:41:47+5:30
चिंता : दोन महिन्यांपासून कारभार ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका भिशी या प्रकारालाही बसला आहे. एका खासगी कंपनीकडून राज्याच्या विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या भिशी या गेल्या दोन महिन्यांपासून थंडावल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
श्रीराम चिट्स या नोंदणीकृत कंपनीतर्फे व्यापाऱ्यांचे विविध गट तयार करून त्यांच्यासाठी भिशी चालविली जाते. १ ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या या भिशी असून, त्यासाठी व्यापाऱ्यांचे विविध गट तयार करून त्यांची जीएसटी विभागाकडे नोंदणी केली जाते. ही कंपनी १९७४ पासून काम करीत असून सध्या महाराष्टÑासह चार राज्यांमध्ये कंपनीचे काम सुरू आहे.
औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या शहरांसह राज्याच्या विविध शहरांमध्ये कंपनीची कार्यालये असून, तेथे भिशी चालविली जाते. पहिल्या महिन्याची रक्कम कंपनी स्वत:कडे ठेवून घेत असते. याशिवाय भिशी लागल्यावर प्रत्येकाकडून ५ टक्के रक्कम घेतली जाते. दर महिन्याच्या तिसºया शनिवारी लिलाव पद्धतीने भिशी काढली जाते. राज्यात मार्च महिन्यापर्यंत या कंपनीच्या भिशी व्यवस्थित सुरू होत्या. मात्र एप्रिलपासून या भिशी बंद पडल्या असून, त्याचे कारण लॉकडाउन असल्याचे सांगितले जाते. लॉकडाउनच्या काळात गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी या भिशी काढण्याला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात येते.
लॉकडाउनच्या काळामध्ये जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, व्यापाºयांना पैशांची चणचण भासत आहे. त्यातच या भिशी योजनांमध्ये पैसा अडकलेला असताना दोन महिने भिशी काढली जात नसल्याने व्यापारी वर्ग चिंतेमध्ये पडला आहे. कंपनीच्या कार्यालयांमध्ये फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथे फोन उचलले जात नाहीत. कंपनीची हेल्पलाइनही तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचा संदेश तेथे फोन केल्यावर मिळत आहे. कंपनीची काही कार्यालये बंद असल्याने याबाबत चौकशी कोठे करायची या संभ्रमामध्ये भिशीचे सदस्य पडले आहेत. या भिशींची जीएसटी विभागाकडे नोंदणी असली तरी गेले दोन महिने कोणतेही व्यवहारच झाले नसतील तर त्याबाबत या विभागाकडे काही कर भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचे एका कर सल्लागाराने सांगितले. कंपनीकडे असलेला पैसा सुरक्षित आहे, मात्र लॉकडाउनच्या काळामध्ये भिशी काढण्यासाठी न मिळालेली परवानगी आणि कर्मचाºयांची कार्यालयातील कमी असलेली उपस्थिती यामुळे सध्या भिशी थांबलेली आहे. लवकरच ही भिशी पुन्हा पूर्ववत होईल, असे कंपनीमधील अधिकारी सांगत आहेत. अनेक ठिकाणी या कंपनीची कार्यालये रहिवासी क्षेत्रात असल्याने तेथील रहिवाशांकडून कार्यालय सुरू करण्यास विरोध होत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
औरंगाबाद : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे ४० ग्रुप आहेत.
च्सोलापूर : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे २५ ग्रुप आहेत.
च्सांगली : भिशीचे १६ ग्रुप आहेत. भिशीच्या प्रमाणात मालमत्ता, तारण ठेवलेली आहे.
च्कोल्हापूर : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे ११ ग्रुप असून ५५० सभासद आहेत.
कंपनीतर्फे जानेवारी ते मार्च महिन्यातील भिशीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने सध्या लिलाव झालेले नाहीत. वसुलीचे काम सध्या सुरू आहे. मुंबई येथील कार्यालयाच्या सूचनेनंतर भिशीच्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
- विश्वनाथ मगदुम, शाखाधिकारी, श्रीराम चिट्स, कोल्हापूर