Ashish Shelar : "ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:28 AM2023-07-26T10:28:33+5:302023-07-26T10:42:35+5:30

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over interview | Ashish Shelar : "ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड"

Ashish Shelar : "ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड"

googlenewsNext

उद्धव ठाकरे यांनी "बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या मेहनतीने जे देऊ शकत होतो ते दिले. बरेच लोक बाहेरून आले तसे गेले असं नाही. ते तसे आले-गेले हा एक भाग झाला, पण ज्यांचा राजकारणातला जन्मच शिवसेनेत झाला. त्यांनीसुद्धा शिवसेना आईवर वार केलाच ना" अशा शब्दांत पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारलं आहे. याच दरम्यान या मुलाखतीवरून भाजपाने खोचक टोला लगावला आहे. "महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे?" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या "कलंका"तून बाहेर पडण्याची धडपड!" असं म्हणत घणाघात केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे काडतुस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!!" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे. 

"महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे?
कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे!
ही कसली मुलाखत...
ही तर जळजळ, मळमळ आणि
अपचनाचे करपट ढेकर
स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या "कलंका"तून बाहेर पडण्याची धडपड!!
भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो
रिकामा डबा टमरेल ठरतो!
एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे
काडतुस
हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आजही काही असंख्य लोक आहेत ज्यांना दिल्यानंतरही ते गेलेले नाहीत. ते माझ्यासोबत आहेत. या पॉडकास्टमध्ये नितीन देशमुख, कैलास पाटील येऊन गेले. बाकी असे अनेक आहेत. मुंबईचे रवींद्र वायकर, अजय चौधरी, सुनील प्रभू किती जणांची नावे घ्यायची, मुंबईबाहेरच सुद्धा अनेक आहेत. शिवसेना कुणाची हा लोकांचा प्रश्न नाहीच. कारण लोकांनी ठरवलेले आहे जिथे शिवसेनाप्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असं त्यांनी म्हटलं.

Web Title: BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.