पवारांचा 'तो' व्हिडीओ अर्धवट शेअर केल्यानं भाजप अडचणीत; गृह विभाग कारवाईच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:56 PM2022-05-12T15:56:28+5:302022-05-12T15:59:02+5:30
शरद पवारांचा व्हिडीओ अर्धवट शेअर करणं भाजपला महागात पडण्याची शक्यता
मुंबई: राज्याचं राजकारण सध्या हिंदुत्वाच्या भोवती फिरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप महाराष्ट्रानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहे. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात असं भाजपनं म्हटलं आहे. मात्र या व्हिडीओवरून भाजप गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण अर्धवट व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या हालचाली गृहविभागानं सुरू केल्या आहेत.
नास्तिक @PawarSpeaks यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 11, 2022
पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते.
पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा! pic.twitter.com/KnTtjUuTHo
भाजपनं शेअर केलेला व्हिडीओ अर्धवट असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून पवारांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पवारांनी कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचा आशय साताऱ्याच्या सभेत सांगितला. तो व्हिडीओ राष्ट्रवादीकडून ट्विट करण्यात आला. याशिवाय जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचे फोटोदेखील शेअर करण्यात आले आहेत.
— NCP (@NCPspeaks) May 12, 2022
झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीकडून भाजपला लगावण्यात आला आहे. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे. पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता..
— NCP (@NCPspeaks) May 12, 2022
भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही..
निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती. pic.twitter.com/MYSjSKj9Gq
शरद पवारांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडीओ शेअर करून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल, याची चाचपणी गृह विभागानं सुरू केली आहे. त्यासाठी गृहखात्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अर्धवट व्हिडीओ शेअर करणं भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे.