कोरोना व्हायरसच्या संकटात महाविरणनं भरीव वीज बिल पाठवून सामान्यांना झटकाच दिला. अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा फटका केवळ सामान्यांनाच नव्हे, तर विविध क्षेत्रातील सेलिब्रेटिंनाही बसला आहे. भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यानंही वाढीव बिलावर नाराजी व्यक्त करताना संपूर्ण परिसराचं बिल मला पाठवलंत का, असा सवाल केला होता. आता या वाढीव बिलाच्या यादीत राजकीय नावाचा सहभाग झाला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवून महावितरणने नाथाभाऊंना शॉकच दिला आहे.
महावितरणने एक लाखाचं वीज बिल पाठवल्याने खडसे संतापले आहेत. नागरिकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये घर आहे. महावितरणने खडसेंना एप्रिल ते जुलै या महिन्याचं 1 लाख 4000 रुपये बिल पाठवलं आहे. प्रचंड प्रमाणात बिल आल्याने खडसे चांगलेच भडकले आहे.
ते म्हणाले,'' महावितरणने मला प्रचंड बिल पाठवलं आहे. सर्वसामान्य लोकांनाही अव्वाच्या सव्वा बिल पाठवलं आहे. महावितरणने भरमसाठ बिल पाठवून सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं . राज्य सरकारने याप्रकरणात ग्राहकांना सवलत द्यावी.''
पाकिस्तानी सैन्याला सक्षम बनवा, बजेट वाढवा; अख्तर म्हणतो, गवत खाण्याचीही तयारी!
बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले