Maratha Reservation: "लोक एकमेकांशी बोलायचे बंद झालेत; प्रत्येक ठिकाणी राजकारण करु नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:24 PM2021-03-11T17:24:21+5:302021-03-11T21:49:51+5:30
maratha reservation - भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) या मुद्द्यावरून अधिक आक्रमक झाले आहेत.
सातारा : ‘मराठा समाजाला आरक्षण ही कुठल्याही एका पक्षाची नाही, तर सर्वच पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.(MP Udayanraje Bhosale Intraction with Media over Maratha Reservation)
उदयनराजे म्हणाले, ‘मराठा कुटुंबात जन्माला आलोय. मराठा म्हणून मी बोलत नाही. त्रयस्थ म्हणून, देशाचा नागरिक म्हणून माझ्या भावना कुटुंबाचा घटक म्हणून व्यक्त करतो. जसा प्रत्येकाला न्याय दिला गेला तसा मराठा समाजाला का नाही? मराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत. मुलांनी शिकून कुटुंबाला हातभार लावावा, अशी अपेक्षा आईवडील ठेवतात. त्यांनी काय करावं? जगात जात हा प्रकार नसता तर निम्म्याच्यावर भांडणं झाली नसती. लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण करु नका. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अस्वस्थ समाजबांधवांनी अनेक मोर्चे काढले आहेत. लोकांची गरज ओळखून तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही उदयनराजे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या; उदयनराजेंची फेसबुक पोस्ट