'उद्धव ठाकरेंची मुलाखत ही घरगुती, बालिश अन् भावनिक प्रश्नांच्या पलीकडे काहीच नसणारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 05:35 PM2020-02-04T17:35:04+5:302020-02-04T17:35:43+5:30
सीएए हा भारतीय संविधानाने आणलेला कायदा आहे, तो कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही,
नवी दिल्ली - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागील दोन दिवसांपासून सामना या वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध करण्यात येत आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेभाजपावर टीका करताना पाहायला मिळाले यावर भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुलाखतीवर टीकास्त्र सोडलं. बालिश, घरगुती आणि भावनिक प्रश्न यापलीकडे मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत काहीच नाही. संजय राऊत यांनी घेतलेली ही घरगुतीपद्धतीची मुलाखत आहे असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.
याबाबत टीव्ही ९ शी बोलताना नारायण राणे म्हणाले की, राज्याची विकासाची दिशा अन् दशा ठरविणारी ही मुलाखत नाही. गेल्या २ महिन्यात त्यांनी केलेलं कामकाज झालेलं नाही, ठोस निर्णय घेतले नाही, शेतकरी, सर्वसामान्य यांना दिलासादायक निर्णय नाही, कर्जमाफीची घोषणा केली पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला काहीच मिळालं नाही. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली, भाजपाने फसवलं हेच वाक्य सतत बोलत असतात असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरेंना काढला.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...
तसेच राज्यातील जनतेच्या अडीअडचणी दूर व्हायला हवी यासाठी काय केलं पाहिजे हे मुलाखतीत असायला हवं. राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने राज्याच्या प्रश्नासाठी काम करावं अशी अपेक्षा आहे. अनुभव नाही असं बोलून चालत नाही, २ महिने काम केल्यावर ३ दिवस सुट्टीवर जातो हे पहिल्यांदाच ऐकले. मातोश्री हे मंत्रालय मग सगळं कामकाज शिफ्ट करा असाही घणाघात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब; भाजपाने केली उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
दरम्यान, सीएए हा भारतीय संविधानाने आणलेला कायदा आहे, तो कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, आधी कायदा पूर्ण वाचावा, अधिकाऱ्यांकडून समजून घ्यावा हे सरकार दिर्घकाळ टिकणार नाही असंही नारायण राणेंनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढण्याचा निर्णय आणि तयारीही झाली होती. मात्र, अमित शहा मातोश्रीवर आले. यामुळे मधल्या काळात काहीही घडलेले असले तरीही वर्षानुवर्षे आपली युती होती. आता पिढी बदलली. कदाचित त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं असेल. पण पुन्हा संबंध सुधारत असतील आणि आपलं उद्दिष्ट आणि ध्येय एक असेल तर मार्ग धुंडाळत बसण्यापेक्षा झालं गेलं विसरून नवीन सुरुवात करायला काय हरकत आहे अशी भूमिका भाजपाशी युती करताना घेतली होती असं उद्धव ठाकरेंनी सांगत भाजपाने शब्द फिरवला असा आरोप केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
आम्ही पाम ऑइल खरेदी करणार; भारताच्या बंदीनंतर पाकचा मलेशियाला मदतीचा हात
जामिया'मध्ये पुन्हा एकदा तणाव; 'गोली मारो' घोषणा देत विद्यापीठात घुसला मोठा जमाव
पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार
"सैनिकांच्या नावाने पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघड केला"
एक दिवस हनुमान चालिसा वाचताना दिसाल, योगींचा ओवैसींवर निशाणा