“महाराष्ट्रात पुन्हा येणार का? २०२४ ला मुख्यमंत्री होणार का?”; विनोद तावडेंचे सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:15 PM2023-12-18T17:15:17+5:302023-12-18T17:20:07+5:30

Vinod Tawde News: इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

bjp vinod tawde reation about will he come return in maharashtra politics | “महाराष्ट्रात पुन्हा येणार का? २०२४ ला मुख्यमंत्री होणार का?”; विनोद तावडेंचे सूचक भाष्य

“महाराष्ट्रात पुन्हा येणार का? २०२४ ला मुख्यमंत्री होणार का?”; विनोद तावडेंचे सूचक भाष्य

Vinod Tawde News: अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपशासित राज्यांची संख्याही वाढली आहे. याचा मोठा फायदा लोकसभा निवडणुकीत करून घेण्याची जय्यत तयारी भाजपाने सुरू केली आहे. पाच राज्यातील विधानसभाची जबाबदारी आणि राजस्थानातील मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून गेलेले विनोद तावडे यांना महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर विनोद तावडे यांनी सूचक भाष्य केले.

विनोद तावडे महाराष्ट्रातील राजकारणातून गेली काही वर्षे दिल्लीतील राजकारणात व्यस्त झाले आहेत. पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना विनोद तावडे यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपाला छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यातील विजयाने मोठं यश मिळालं आहे. या राज्यातील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी लोकांना खरी वाटली आणि कार्यकर्त्यांची मेहनतीने हे शक्य झाले आहे. या राज्यातील विजय हा सर्वांचा विजय आहे. आपण अजूनही शिकत आहोत आणि काम करीत आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’

महाराष्ट्रात परतण्याबाबत आणि २०२४ मधील मुख्यमंत्रीपदाबाबत विनोद तावडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तुम्हाला अभिमान वाटायला हवा की, आमचा मराठी माणूस दिल्लीत काम करतोय. सध्या तरी आपण महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाही. सध्या ‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’, असे सांगत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले. तसेच इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे. पंजाब आणि बंगालमध्ये त्यांना जागा देणार नाही असे सांगितले आहे. मग जागा राहिल्या कुठे? असा सवाल विनोद तावडे यांनी केला. तसेच कॉंगेसच्या खासदार साहू यांच्यावरील कारवाईनंतर कॉंग्रेसच्या तिजोरीत खडखडाट आहे असे वाटत नाही, असे विनोद तावडे म्हणाले. 

दरम्यान, भाजपाने चार राज्यात नवीन चेहरे दिले आहेत. मध्य प्रदेशात मोहन यादव हे नवीन नाव असले तरी ते अपरिपक्व नाहीत. मोहन यादव तीन टर्मचे आमदार आहेत. मोहन यादव यादव असण्यापेक्षा ते कार्यकर्ते आहेत. प्रस्थापित नाव सोडून ते नाव का आले असेल असे वाटत असेल. पण पक्षाने दिलेले काम करावे लागेल हे लक्षात असले पाहिजे. पंकजाताई महाराष्ट्रात सक्रीय आहेत आणि केंद्रात देखील त्याचे काम दिसते. महाराष्ट्र पॅटर्न कसेल ते मी ठरवित नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
 

Web Title: bjp vinod tawde reation about will he come return in maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.