Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:51 PM2020-09-09T21:51:08+5:302020-09-09T21:52:24+5:30

नियोजित वेळापत्रकानुसार येत्या १० सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार होती.

Breaking : Class XI admission process postponed; Decision due to order of the Supreme Court | Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय

Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देराज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती

पुणे: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून त्यात प्रत्येक संवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी निश्चित झालेल्या आरक्षणानुसार प्रवेश दिला जात आहे. मात्र,सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.नियोजित वेळापत्रकानुसार येत्या १० सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार होती.परंतु,न्यायालयाच्या आदेशामुळे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे,असे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या प्रवेश फेरीतून सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून दुसऱ्या फेरीसाठी सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी येत्या १० सप्टेबर रोजी प्रसिध्द केली जाईल,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु,अकरावी प्रवेश प्रक्रिया यापूर्वी निश्चित झालेल्या आरक्षणानुसार राबविली जाता आहे.प्रवेश प्रक्रिया सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय दिला.त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतच्या पुढील कार्यवाहीची माहिती अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे,असेही राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Breaking : Class XI admission process postponed; Decision due to order of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.