जातीधर्मातील तेढ कमी करायला हवे

By admin | Published: May 29, 2017 02:24 AM2017-05-29T02:24:06+5:302017-05-29T02:24:06+5:30

मी छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्यासाठी छत्रपतींचे कुळ हे महत्त्वाचे आहे. बहुजनांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न

Casteism needs to be reduced in strength | जातीधर्मातील तेढ कमी करायला हवे

जातीधर्मातील तेढ कमी करायला हवे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मी छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्यासाठी छत्रपतींचे कुळ हे महत्त्वाचे आहे. बहुजनांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडविणे या एकाच विचाराने राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचा मी स्वीकार केला आहे. जातीधर्मातील तेढ बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी समाज प्रबोधन झाले पाहिजे, असे विचार खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली.
महाराष्ट्र राज्य छावा क्रांतिवीर सेनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे शनिवारी झाले. त्या वेळी संभाजीराजे बोलत होते. या वेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर, उमेश शिंदे, शिवाभाऊ तेलंग, नितीन दातीर, विशाल गव्हाणे, प्रकाश पाटील, राम घायतिडक पाटील,आरिफ सुभान शेख, अनिता पैठणपगार, सागर भोसले,राजू फाले उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, ‘‘मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत. बहुतांश मराठा समाज हा शेती करतो. आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. समाजकार्य करण्यासाठी मी राजवाडा सोडून बहुजनांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवला. गडकोट संवर्धनासाठी पाठपुरावा केला.’’

अधिवेशनातील ठराव
शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करावे. मराठा आरक्षण त्वरित जाहीर करावे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करावा. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण व वसतिगृह निर्माण करावे. महिला सबलीकरण व संरक्षण कायदा अंमलात आणावा. सर्व थोर महापुरुषांची अवहेलना थांबवावी व गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे. भ्रूणहत्या थांबवावी.

पानसरे, साने, शेख यांचा गौरव

माजी महापौर आझम पानसरे (समाजभूषण), नगरसेवक दत्ता साने (द ग्रेट मराठा) आरिफ सुभान शेख (मराठा मित्र), दत्तात्रय धोंडिबा भोजले, प्रकाश पाटील, यशवंत देसाई (उद्योजक), हभप अनिता जाधव, कांचन जगताप (राजमाता जिजाऊ), शिवाजी दगडू मेमाने, भाऊसाहेब सावंत (प्रगतिशील शेतकरी), डॉ. किशोर निकम (आदर्श शिक्षक), डॉ. अनिल काळे, डॉ. सुजित परदेशी (वैद्यकीय सेवा), संतोषानंदजी शास्त्री (धर्मरक्षक), सुनीता गजे (कीर्तनकार), स्वराली थोरात (कला संस्कृती) यांना गौरवण्यात आले.

Web Title: Casteism needs to be reduced in strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.