शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

जातीधर्मातील तेढ कमी करायला हवे

By admin | Published: May 29, 2017 2:24 AM

मी छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्यासाठी छत्रपतींचे कुळ हे महत्त्वाचे आहे. बहुजनांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मी छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा पाईक आहे. माझ्यासाठी छत्रपतींचे कुळ हे महत्त्वाचे आहे. बहुजनांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडविणे या एकाच विचाराने राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचा मी स्वीकार केला आहे. जातीधर्मातील तेढ बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी समाज प्रबोधन झाले पाहिजे, असे विचार खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली.महाराष्ट्र राज्य छावा क्रांतिवीर सेनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे शनिवारी झाले. त्या वेळी संभाजीराजे बोलत होते. या वेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर, उमेश शिंदे, शिवाभाऊ तेलंग, नितीन दातीर, विशाल गव्हाणे, प्रकाश पाटील, राम घायतिडक पाटील,आरिफ सुभान शेख, अनिता पैठणपगार, सागर भोसले,राजू फाले उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले, ‘‘मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत. बहुतांश मराठा समाज हा शेती करतो. आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. समाजकार्य करण्यासाठी मी राजवाडा सोडून बहुजनांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी संसदेत सर्वात प्रथम आवाज उठवला. गडकोट संवर्धनासाठी पाठपुरावा केला.’’अधिवेशनातील ठरावशासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करावे. मराठा आरक्षण त्वरित जाहीर करावे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करावा. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण व वसतिगृह निर्माण करावे. महिला सबलीकरण व संरक्षण कायदा अंमलात आणावा. सर्व थोर महापुरुषांची अवहेलना थांबवावी व गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करावे. भ्रूणहत्या थांबवावी.पानसरे, साने, शेख यांचा गौरवमाजी महापौर आझम पानसरे (समाजभूषण), नगरसेवक दत्ता साने (द ग्रेट मराठा) आरिफ सुभान शेख (मराठा मित्र), दत्तात्रय धोंडिबा भोजले, प्रकाश पाटील, यशवंत देसाई (उद्योजक), हभप अनिता जाधव, कांचन जगताप (राजमाता जिजाऊ), शिवाजी दगडू मेमाने, भाऊसाहेब सावंत (प्रगतिशील शेतकरी), डॉ. किशोर निकम (आदर्श शिक्षक), डॉ. अनिल काळे, डॉ. सुजित परदेशी (वैद्यकीय सेवा), संतोषानंदजी शास्त्री (धर्मरक्षक), सुनीता गजे (कीर्तनकार), स्वराली थोरात (कला संस्कृती) यांना गौरवण्यात आले.