राजनच्या चौकशीस सीबीआयला परवानगी

By Admin | Published: January 20, 2016 02:44 AM2016-01-20T02:44:07+5:302016-01-20T02:44:07+5:30

ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनची चौकशी करण्याची परवानगी मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाने सीबीआयला दिली.

The CBI's permission to Rajan's inquiry | राजनच्या चौकशीस सीबीआयला परवानगी

राजनच्या चौकशीस सीबीआयला परवानगी

googlenewsNext

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनची चौकशी करण्याची परवानगी मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाने सीबीआयला दिली. सीबीआय छोटा राजनची चौकशी दहा दिवस करणार आहे.
जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनच्या चौकशीची परवानगी गेल्या सुनावणीवेळी सीबीआयने विशेष मोक्का न्यायालयाकडे मागितली होती. न्या. ए. एल. पानसरे यांनी सीबीआयला दहा दिवस चौकशी करण्याची परवानगी देत, या खटल्यावरील पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. २७ जानेवारीपासून सीबीआय चौकशीस सुरुवात करेल.
मंगळवारी छोटा राजनला तिहार कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष न्यायालयात हजर केले. छोटा राजनने आरोपपत्राची प्रत मिळाल्याची माहिती न्यायालयाला दिली. मात्र, आरोपपत्र वाचले नसल्याने, ते वाचण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्याची विनंती छोटा राजनने न्या. पानसरे यांना केली.
११ जून २०११ रोजी जे. डे. यांची राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. २०११ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रात सतीश कालिया, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश आगवाने, विनोद अन्सारी, पॉल्सन जोसेफ आणि दीपक सिसोदिया यांचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात जिग्ना वोरा या महिला पत्रकाराचे नाव समाविष्ट करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जे. डे. यांनी छोटा राजनविरुद्ध दिलेल्या वृत्ताबाबत छोटा राजन अस्वस्थ होता. त्यातच भर म्हणून वोराने व्यावसायिक वैर बाहेर काढत, जे. डे. यांची हत्या करण्यासाठी राजनला चिथावले.
४ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने छोटा राजनवरील राज्यातील सर्व केसेसवर सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची नियुक्ती केली, तर दुसरीकडे राजनने मुंबईत त्याच्या जीवाला धोका आहे, असे म्हणत, मुंबईत पाठवण्यात येऊ नये, यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका केली. (प्रतिनिधी)
वकील नेमण्यासाठी विनंती
‘मला कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. मला आठवड्यातून एकदाच बाहेर काढण्यात येते. त्यामुळे आरोपपत्र वाचण्यासाठी मुंबईत वकील नेमण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा,’ अशी विनंती छोटा राजनने न्यायालयाला केली. त्यावर न्या. पानसरे यांनी छोटा राजनला सांगितले की, ‘दिल्लीचे वकील अंशुमन सिन्हा न्यायालयात उपस्थित आहेत.’ ७ जानेवारी रोजी विशेष न्यायालयाने मुंबई
पोलिसांनी राजनला वेळेत आरोपपत्राची प्रत न
दिल्याने धारेवर धरले होते. ‘आता का नाही?
कोणाची वाट पाहत आहात? तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आदेशाची वाट पाहता,’ असे म्हणत न्यायाधीशांनी राजनला आरोपपत्राची प्रत देण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला.

Web Title: The CBI's permission to Rajan's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.